abhidnya bhave boyfriend

तुला पाहते रे, खुलता कळी खुलेना, चला हवा येऊ द्या अशा विविध मालिका, शोच्या माध्यमातून मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. तिचं दिलखुलास हसणं हे खरं तर अनेक तरुणांना घायाळ करणारं आहे याच कारणामुळे दिवसेंदिवस तीच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मराठी मालिकांमधून खलनायिका म्हणून नावारूपास आलेली अभिज्ञा आज अनेकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहे. यातच आणखी एक आनंदाची बातमी तीने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

abhidnya bhave pic
abhidnya bhave pic

आणि ती म्हणजे अभिज्ञा चक्क एका व्यक्तीच्या प्रेमात असल्याचे पोस्टद्वारे सांगितले आहे. अभिनेत्री अभिज्ञा भावे ज्या व्यक्तीच्या प्रेमात आहे त्या व्यक्तीचे नाव आहे “मेहुल पै”. अभिज्ञाने मेहुल पै सोबतचा एक फोटो ‘heart’ असे कॅप्शन देऊन सोशल मीडियावर पोस्ट केला आणि तिच्या या बातमीने चाहत्यांसह अनेक मराठी कलाकारांनीही शुभेच्छांचा वर्षाव केलेला पाहायला मिळतो आहे. मेहुल पै याने डी जी रुपारेल कॉलेजमधून फिलॉसॉफी विषयातून बीएची पदवी मिळवली आहे. मेहुल मुंबईत वास्तव्यास असून मागील १२ वर्षांपासून ‘क्लॉकवर्क्स इव्हेंटस प्रायव्हेट लिमिटेड’ मध्ये तो ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. यातून इव्हेंट मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनिंगचा भार तो सांभाळत आहे.
मराठी सृष्टीत येण्याआधी अभिज्ञा ही एअरहोस्टेस म्हणून कार्यरत होती. २०१० सालच्या ‘प्यार की ये एक कहाणी’ या हिंदी मालिकेतून तीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. २०१४ साली ती वरूण वैटिकर यांच्यासोबत विवाहबद्ध झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *