बऱ्याचदा लोकांना त्यांच्या जोडीदाराशी मिळतंजुळतं घेता येताच असं नाही. त्यामुळे त्यांना दुसरा विवाह ही करावा लागतो आणि मग ते यशश्वी ठरतातही. बऱ्याच मराठी कलाकारांच्या बाबतीतही काही असच घडलय. चला पाहुयात काही मराठी कलाकारांच्या लाईफ बद्दल ज्यांचे पहिले लग्न अपयशी ठरल्यानंतर त्या कलाकारांनी थाटला दुसरा संसार


महेश मांजरेकर प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता यांनी खाजगी आयुष्यात दोनदा लग्न गाठ बांधली आहे त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव दीपा तर दुसऱ्या पत्नीचे मेधा मांजरेकर. दीपा सोबत महेश मांजरेकर याचे लव्ह मॅरेज झाले होते पहिल्या पत्नीपासून सत्या मांजरेकर आणि आश्विनी मांजरेकर अशी दोन मुले आहेत. पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर महेश मांजरेकर यांनी मेधा मांजरेकर यांच्याशी लग्न केले.

मेधा आणि महेश यांची भेट एका कार्यक्रमात झाली होती पाहताच क्षणी मेधा यांची निवड आई या चित्रपटासाठी केली होती हळूहळू दोघात मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मेधा आणि महेश यांना एक मुलगी आहे काकस्पर्श या चित्रपटात मेधा यांची मुलगी सई झळकळी होती.


रेणुका शहाणे सुरभी या कार्यक्रमामुळे प्रेक्षकांसमोर आलेली अभिनेत्री. रेणुका शहाणे हीच लग्न हिंदी भाषिक आशुतोष राणा सोबत झाले आहे आशुतोष राणा यांचे पहिले तर रेणुका शहाणे यांचे हे दुसरे लग्न आहे. रेणुका यांच्या पहिल्या पतीची माहिती कुठेच उपलब्ध नाही रेणुका यांचे लग्न हे लव्ह मॅरेज होते. पहिल्या अपयशी लग्नातून खूप काही शिकले असे एका मुलाखातीतून रेणुका यांनी सांगितले. पहिले लग्न अपयशी ठरल्यानंतर रेणुका याची आशुतोष यांच्याशी भेट झाली ३१ डिसेंबर १९८८ रोजी या दोघांनी कॉमन फ़्रेंड अभिनेत्री राजेश्वरीच्या माध्यमातून भेट झाली. आशुतोष याचे कुटूंब मोठे आहे, त्यांना ५ बहिणी ७ भाऊ आहेत. मध्यप्रदेशातील एका छोट्या गावातून ते आहेत आशुतोष याच्या बरोबर निर्णय घेतल्याने रेणुका याचे वडील आनंदी होते मात्र आई शांता गोखले यांना थोडे दडपण आले होते याचे कारण म्हणजे दोन्ही परिवारातील रितीरिवाज-परंपरा खूप वेगळ्या आहेत रेणुका यांनी समजूत घातल्यानंतर त्याची आई या लग्नाला तयार झाली २ वर्ष रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर २५ मे २००१ रोजी दोघेही लग्न गाठीत अडकले.


अस्मिता मालिकेतील पियुष रानडे यांचेही दोनदा लग्न झाले आहे. पियुष रानडे यांच्या पहिल्या पत्नीचे नाव शाल्मली तोलये. मात्र हा विवाह फार काळ टिकला नाही काही वर्षांतच ते विभक्त झाले. पुढे पियुष आणि अस्मिता मालिकेतील मयुरी वाघ यांचे मालिकेदरम्यान प्रेम जुळले. फेब्रुवारी २०१७ साली दोघांचे लग्न झाले.


श्री ची भूमिका साकारणारा प्रसिद्ध कलाकार शशांक केतकर याचेही दोनदा लग्न झाले आहे. होणार सून मी या घरची या मालिकेतील तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांचेही मालिकेदरम्यान प्रेम जुळले आणि प्रेमाचे रूपांतर लग्नात झाले, पण मालिका संपता संपता दोघांचे नातेही संपुष्टात आले. त्यानंतर त्याने “आईच्या गावात” नावाचं आलिशान हॉटेल काढलं. नोव्हेंबर २०१७ साली शशांक केतकर यांनी प्रियांका ढवळे हिच्याशी लग्न केलं.


मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीच पहिलं लग्न दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्याशी झालत. २००७ साली दोघांचं डिवोर्स झाल्यानंतर २०१० साली नचिकेत पंतवैद्य यांच्याशी त्यांनी दुसरा विवाह केला. नचिकेत यांचेही हे दुसरे लग्न आहे. सध्या या दोघांना एक मुलगी आहे, तिचे नाव कावेरी.


स्वप्नील जोशी मराठी सिनेसुष्टीतील चॉकलेट हिरो स्वप्नील जोशी हेसुद्धा खाजगी आयुष्यात दोनदा लग्नाच्या बेडीत अडकले. स्वप्नीलचे दुसरे लग्न ओरंगाबादच्या लीना आराध्या बरोबर झाले. स्वप्नील आणि लीना १६ डिसेंबर२००० रोजी लग्नाच्या बेडीत अडकले विशेष म्हणजे स्वप्नील आणि लीनाचे अरेंज मॅरेज आहे. स्वप्निलच्या पहिल्या पत्नीचे नाव अर्पणा आहे ११ वीत असताना स्वप्नील आणि अर्पणाचे सुत जुळले होते पुढे त्यांनी लग्नही केले मात्र फार काळ हे नाते काही टिकले नाही. लग्नाच्या काही वर्षा नंतरच स्वप्नील आणि अर्पणा यांचा २००९ साली घटस्फोट झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *