शंतनू मोघे (छत्रपती शिवाजी महाराज) – शंतनू मोघे हे सुप्रसिद्ध साहित्यिक कलाकार श्रीकांत मोघे यांचे चिरंजीव आहेत. रात्र वणव्याची, कॅरी ऑन मराठा, रणभूमी अश्या कित्तेक चित्रपटात त्यांनी काम केलाय तर कॅच दि चान्स, बंधमुक्त, तुजसाठी प्रिया रे हि त्यांची गाजलेली मराठी नाटके. शंतनू मोघे मूळचे पुण्याचे. पुण्याच्या सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून त्यांनी सिव्हिल इंजिनीरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे.
शंतनू मोघे आणि प्रिया मराठे यांचं २४ एप्रिल २०१२ रोजी लग्न झालं. कॉलेज पासूनच्या मैत्रीचे कधी प्रेमात रूपांतर झाले हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही. एकदा पावसाळ्यात लॉग ड्राईव्ह ला येतेस का असं शंतनूने प्रियाला विचारले आणि तीही हो म्हणाली. मुंबईत फिल्म सिटीमध्ये त्याने तिला प्रपोज केलं तिथेच तीचा होकार ही मिळवला.

अमोल कोल्हे (शिवपुत्र राजे संभाजी महाराज) – डॉ.अमोल रामसिंग कोल्हे यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९८० साली पुण्याजवळील नारायणगाव येथे झाला. आठवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी तेथेच घेतले आणि मग पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. आपटे प्रशालेतून विज्ञान शाखेमधून त्यांनी १२ वीपर्यंतचे शिक्षण घेतले. १०वी आणि १२वीच्या निकालांत त्यांचा गुणवत्ता यादीत समावेश होता. पुढे ते एम.बी.बी.एस.ची पदवी घेण्यासाठी मुंबईला गेले आणि त्यांनी सेठ गोवर्धनदास सुंदरदास (जी.एस.) महाविद्यालयातून त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण (mbbs) पूर्ण केले.
डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्‍नी अाश्विनी ह्याही डॉक्टर असून डॉ. अाश्विनी ह्या वैद्यकीय महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक आहेत. अमोल आणि अाश्विनी ह्यांना दोन मुले आहेत. एक मुलगी आणि एक मुलगा त्याची नावे आद्या आणि रुद्र. डॉ. अमोल कोल्हे सध्या मुंबईत स्थायिक असून ते नेहमीच सहपरिवार गडकिल्ले भ्रमंती करीत असतात.

पूर्वा गोखले (छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी सईबाईं) – पूर्वा गोखलेचा जन्म २० जानेवारी १९७८ साली ठाण्यात झाला. शालेय शिक्षण होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कुल, ठाणे येथे केले. पूर्वा क्लासिकल नृत्यातही निपुण आहे. मुलुंडमध्ये व्ही. जी. वझे कॉलेज मधून शिक्षण घेतले. पूर्वाची आई कांचन गुप्ते ह्या देखील अभिनेत्री आहेत. दूरदर्शनवरील टेलिफिल्म ‘ मना सज्जना’ यात पूर्वाने आणि तिच्या आईने प्रथमच एकत्र काम केले होते, हि फिल्म पूर्वाच्या वडिलानेच निर्मित केली होती. ‘कोई दिल में हैं’ ,कहाणी घर घर कि या हिंदी मालिकांमध्ये तिने काम केले. तिने ‘ बुंदे ‘ हा हिंदी गाण्याचा अल्बम देखील केला. ‘कुलवधू ‘ ह्या मालिकेमुळे पूर्वाला भरभरून यश आणि प्रसिद्धीदेखील मिळाली. तिने मराठी रंगभूमीवरही आपली कामगिरी बजावली.
पूर्वा गोखले यांनी केदार गोखले या व्यवसायिकासोबत लग्नगाठ बांधली. पूर्वा गोखले आणि केदार गोखले त्यांना दोन मुलीही आहेत. पूर्वा गोखले सध्या करत असलेलं असीम एनटरटेन्मेन्टच ‘सेल्फी’ हे नाटकही जोरात सुरु आहे.

पल्लवी वैद्य (छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी पुतळाबाई) – पल्लवी वैद्य यांचं लग्नापूर्वीच नाव पल्लवी तळवलकर, त्या मूळच्या मुंबईच्या मुंबईच्या गुरुनानक खालसा कॉलेजमधून त्यांनी सायन्स मधून ग्रॅडजुएशण केलं. कदाचित तुम्हाला माहित नसेल अभिनेत्री पूर्णिमा भावे-तळवळकर म्हणजे (होणार सून मी ह्या घरची मालिकेतील बेबी आत्या) ह्या पल्लवी वैद्य यांची सक्खी मोठी बहीण आहे.
चार दिवस सासूचे, कुलवधू, रुंजी यासारख्या प्रसिद्ध मालिकामध्ये दर्जेदार भूमिका साकारायला मिळाल्या.झाले मोकळे आकाश, गर्भ या चित्रपटात तिने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. कुलवधू ह्या मालिकेसाठी झी वाहिनीचा बेस्ट ऍक्टरेसचा अवॉर्ड हि तिला मिळाला आहे. ऐतिहासिक रोमहर्षक अश्या मालिकेत काम करण्याची तिची हि पहिलीच वेळ, ह्या मालिकेमुळे ती इतिहासात जगतेय असे तिने तिच्या ट्विटरच्या अकाउंटवर नुकतेच ट्विट केलेय.

अश्विनी महांगडे (शिवकन्या महाराणी राणूबाई) – अश्विनी मूळची सातारा जिल्ह्यातील पसरणी, वाई या गावात जन्मलेली मुलगी. वडिलांचे नाव प्रदीपकुमार तर आईचे नाव विद्या महंगाडे. तर मोठ्या बहिणीचे नाव मृण्मयी, ती वकील आहे. अश्विनी महंगडे ही श्री भैरवनाथ विद्यालय, पसरणी येथून शालेय शिक्षण तर वाई येथील किसनविर महाविद्यालयातुन तिने बीकॉम चे शिक्षण पूर्ण केले. त्याचप्रमाणे तिने हॉटेल मॅनेजमेंट ची पदविदेखील प्राप्त केली आहे. पण पुढे तिने अभिनयक्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला.
झी मराठीवरील ” अस्मिता ” ही तिची मालिका विशेष लक्षणीय ठरली. यात तिने ‘मनाली’ उत्कृष्ट साकारली होती. लक्ष्य, ब्रह्मांडणायक, भेटी लागे जिवा, सावर रे, लक्ष्य या तिने अभिनयाने साकारलेल्या मालिका. बॉईज, उणीव, टपाल उभा चित्रपटातही तिने काम केले आहे

प्राजक्ता गायकवाड (शंभू महाराज्यांच्या पत्नी महाराणी येसूबाई) – प्राजक्ता गायकवाड मूळच्या पुण्याच्या. पुण्यातील एच.एच.सी.पी. हायस्कूल फॉर गर्ल्स (हुजूरपागा) मधून शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर पुण्याच्या गव्हर्मेंट पॉलीटेकनिक कॉलेजमधून इन्फॉर्मशन टेकनॉलॉजीचे (कॉम्पुटर इंजिनीरिंग) शिक्षण पूर्ण केले.
नांदा सौख्यभरे या झी वाहिनीच्या मालिकेतून प्राजक्ता गायकवाड हिने मालिकांत पदार्पण केलं. कॉलेजच्या फॅशन शो मध्ये काम करताकरता तिला अभिनयाची आवड निर्माण झाली. त्यातूनच तिला हि मालिका मिळाली. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिला स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत शंभू महाराज्यांच्या पत्नी राणीयेसूबाईंची भूमिका साकारायला मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *