पल्लवी सुभाष राहिली ह्या अभिनेत्यासाठी अविवाहित.. तब्बल ९ वर्ष दोघे होते दोघे एकमेकांच्या प्रेमात

पल्लवी सुभाष या चित्रपट, जाहिरात, मालिका आणि नाटक या माध्यमात काम करणाऱ्या अभिनेत्री आहेत. त्यांनी आजवर मराठी, हिंदी, तमिळ तेलगु, कन्नड, श्रीलंकन अश्या अनेक भाषांमद्धे काम केले आहे. बी कॉम चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पल्लवी सुभाष यांना नाटकाची विचारणा झाली आणि त्यानंतर त्यांचा कला क्षेत्रात प्रवास सुरु झाला, तुम्हारी दिशा या मालिकेमार्फत त्यांनी पदार्पण केले, यानंतर एकता कपूर यांनी त्यांना करम अपना अपना या मालिकेत गौरी या पत्रासाठी निवडले, त्यानंतर त्यांनी अनेक मालिकांमधून काम केले.

कुंकु झाले वैरी या २००५ मद्धे प्रदर्शित झालेल्या चित्रपटामार्फत त्यांनी चित्रपटात पदार्पण केले, या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना झी गौरव सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री साठी नामांकन मिळाले. त्यानंतर त्यांनी आयला रे, अशी मी अशी ती, प्रेमसूत्र, धावा धावा खुन खुन या मराठी भाषेतील चित्रपटासोबत इतर भाषेतील चित्रपटात देखील काम केले. एका मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान तिची ओळख अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्या सोबत झाली. पुढे दोघांची घट्ट मैत्री बनली आणि मैत्रीचे रुपान्तर प्रेमात कधी झाले हे दोघाना हि कळले नाही.
तब्बल ९ वर्ष हे दोघे एकमेकांच्या प्रेमात होते पण पुढे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. मागील वर्षी अनिकेत विश्वासराव याने मराठी अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिच्याशी लग्नगाठ बांधली. पण इकडे पल्लवी सुभाष अजूनही अविवाहित राहिली. कदाचित ह्याच कारणामुळे अजूनही पल्लवी सुभाष लग्नाच्या विचारात नाही.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *