ज्येष्ठ गायिका तसेच संगीत शिक्षिका सुषमा जोशी या अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्या आई. त्यांनी एसएनडीटी मधून संगीतात एमए केलं तर मनोहर बर्वे यांच्याकडून संगीत शिक्षणाचे धडे गिरवले. ५ ऑक्टोबर२०११ साली वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांचे लीलावती हॉस्पिटलमध्ये प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मधुसूदन जोशी यांच्यासोबत त्या विवाहबंधनात अडकल्या होत्या. सुषमा जोशी यांना तीन अपत्ये पद्मश्री, पल्लवी आणि मुलगा अलंकार. दिलेल्या फोटोमध्ये तुम्हाला हि तिन्ही भाऊ बहिणी एकत्र पाहायला मिळतील. बऱ्याच दिवसानंतर पल्लवीच्या भावाने भारतात आल्यावर हे फोटो काढून सोशिअल मीडियावर शेअर केले आहेत.

पल्लवी जोशी हिने एक बालकलाकार म्हणून बॉलिवूड सृष्टीत आपला जम बसवला होता. आदमी सडक का, डाकू और महात्मा, छोटा बाप, रक्षाबंधन, दोस्त असावा तर असा या चित्रपटातून बाल भूमिका बजावून क्रोध, मृगनैनी, मिस्टर योगी, तलाश, ग्रहण, रिता, अल्पविराम यासारख्या मालिका आणि चित्रपटात प्रमुख भूमिका बजावल्या. प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सोबत तिने लग्न केले. पल्लवी जोशी हिचा भाऊ मास्टर अलंकार हा देखील बॉलिवुड सृष्टीत एक बालकलाकार म्हणून आपले नाव लौकिक करताना दिसला. त्यानंतर तो परदेशात जाऊन आपला ५०० कोटींची उलाढाल असलेला बिजनेस सांभाळत आहे. त्याची मुलगी अनुजा जोशी हीदेखील अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. पल्लवी जोशी हिची मोठी बहीण “पद्मश्री जोशी” मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. नणंद भावजय चित्रपटात तिने नणंदबाईची भूमिका बजावली होती. “चंपा चमेली की जाई अबोली पहा माझी… ” हे गाजलेलं गाणं तिच्यावर चित्रित झालं होतं.

पोरीची धमाल बापाची कमाल, नवलकथा या चित्रपटात तिने काम केले. मराठीतील प्रसिद्ध अभिनेते “विजय कदम” यांच्यासोबत पद्मश्री विवाहबंधनात अडकल्या आणि पद्मश्री जोशीच्या त्या पद्मश्री कदम झाल्या. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, विजय कदम यांनी दोनदा प्रपोज करूनही त्यांनी लग्नाला नकार दिला होता परंतु “विच्छा माझी पुरी करा” या नाटकातील विजय कदम यांनी साकारलेल्या भूमिकेमुळे त्या त्यांच्या प्रेमात पडल्या आणि आपला होकार कळवला. विजय कदम आणि पद्मश्री कदम यांना गंधार नावाचा मुलगा आहे. तो गायक तसेच संगीत निर्मिती क्षेत्रात आपले करिअर घडवू पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *