बिग बॉस सिजन २ मध्ये प्रसिद्ध शेफ पराग कान्हेरे सध्या सोशल मीडियावर चर्चेत येऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने किशोरी शहाणे यांच्यासोबत आपला एक किस्सा शेअर केला आहे. पराग जेव्हा एका निवांत क्षणी किशोरी शहाणे यांना हा किस्सा ऐकवतो त्यावेळी किशोरी ताईंना याची कुठलीच कल्पना नसल्याने मला धक्का बसल्याची भावना व्यक्त केली होती. पराग कान्हेरे ह्याचा भाचा अगदी लहानपणापासूनच किडनीच्या विकाराने त्रस्त होता.

ही घटना जेव्हा तो किशोरीताई यांच्यासोबत शेअर करत होता त्यावेळी त्याने म्हटले की, ‘ माझा भाचा आता १२ वर्षाचा आहे. लहानपणापासून एका आजारामुळे त्याची एक किडनी फेल झाली होती आणि एकच किडणीवर तो आपले आयुष्य जगत होता. तो दिसायला खूप स्मार्ट मुलगा असल्याने त्याने आमच्या प्रोजेक्टसाठी मॉडेलिंग देखील केले आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून त्याची तब्येत आणखीनच खालावत गेली होती. एवढे की तो अंथरूणावरून हलूही शकत नव्हता. त्यामुळे दिवसेंदिवस त्याची अवस्था बिकट होत गेली. मी आयसीयूमध्ये त्याला बघितले तेव्हा माझ्या मावस भावाला किडनी डोनरमध्ये माझे नाव लिहिण्यास सांगितले. पुढील सर्व चाचण्यामध्ये माझा रक्तगट आणि किडनी मॅच झाली आणि मी त्याला माझी किडनी डोनेट केली. ‘ त्याचे हे बोलणे ऐकून क्षणभर किशोरीताई अवाक होऊन त्याच्याकडे पाहु लागल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *