“लय भारी ” चित्रपटातून मराठी सिनेमांत एन्ट्री घेतलेली मराठमोळी अभिनेत्री आदिती पोहनकर हिचे आपण बरेचसे फोटो साडीतच पहिले असतील. आदिती पोहनकर हिने रितेश देशमुख सोबत काम केल्यामुळे ती चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आली. आदिती पोहनकर हि प्रसिद्ध मॅरेथॉन रणर सुधीर पोहनकर ह्यांची कन्या आहे. तर आई प्रसिद्ध जागतिक पातळीच्या महिला हॉकी पट्टू होत्या. बहीण निवेदिता पोहनकर हि एक लेखिका असून तिने काही दिवसांपूर्वीच मकरंद देशपांडे ह्या अभिनेत्यासोबत लग्न केले आहे.

आदिती पोहनकर हिने यापूर्वी २ दाक्षिणात्य चित्रपटांत काम केले त्यानंतर तिला “लय भारी हा चित्रपट मिळाला. लय भारी चित्रपटानंतर तिने “कोणासाठी कुणीतरी” हा मराठी चित्रपट हि केला पण त्यात तिला हवे तेवढे यश मिळाले नाही. पण काही वर्षांपूर्वीच तिने केलेला हिंदी चित्रपट “लव्ह सेक्स और धोका” हा चित्रपट चांगलाच गाजला.
आदिती पोहनकर हिला आपण नेहमी साडीत किंवा ड्रेस मध्ये पहिले असेल तिने यापूर्वी कधीही कमी कपड्यांतला फोटो आपल्या सोशिअल मीडियावर शेअर केला नव्हता. पण काही दिवसांपूर्वी नववर्षाच्या स्वागतासाठी ती गोव्यात असतांना तिने बिकिनीतील एक फोटो शेअर केला. तिच्या ह्या फोटोची काहींनी स्तुती केली. झेरॉ फिगर मध्ये तू खूप शोभून दिसतेस असे चांगले कंमेंट हि केले तर काहींनी कृपया करून तू पुन्हा असले फोटो टाकू नकोस तू आहेस तशी सुंदर दिसतेस उगाच दिखावा करू नकोस असा सल्लाही दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *