neelima actress

१९८४ साली नवरी मिळे नवऱ्याला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, संजय जोग, निवेदिता सराफ, अशोक सराफ, जयराम कुलकर्णी, दया डोंगरे, नीलिमा परांडेकर अशा मातब्बर कलाकारांनी हा चित्रपट चांगलाच गाजवला होता. चित्रपटातील ‘निशाणा तुला दिसला ना…’ हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय असलेलं पाहायला मिळतं. हे गाणं नीलिमा परांडेकर आणि अशोक सराफ यांच्यावर चित्रित झालं होतं. आज या चित्रपटातील अभीनेत्री नीलिमा परांडेकर यांच्याबद्दल जाणून घेऊयात…

neelima parandekar actress
neelima parandekar actress

अभिनेत्री नीलिमा परांडेकर यांनी मराठी रंगभूमिपासून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. १९७६ सालच्या ‘आधार’ या नाटकात त्यांना रमेश देव , सीमा देव, मच्छिंद्र कांबळी अशा मातब्बर कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. माहेरची माणसं अशा आणखी काही मराठी चित्रपटातून त्या प्रेक्षकांसमोर आल्या. मराठी नाटक, चित्रपटातून सह नायिका म्हणून काम मिळवलेल्या ह्या अभिनेत्रीने पुढे जाऊन हिंदी सृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला हे विशेष. ढुंढ लेगी मंजिल हमें, एक घर बनाउंगा, बिट्टी बिजनेसवाली अशा हिंदी मालिकांमधून त्यांनी आईच्या भूमिका गाजवल्या. २०१३ सालच्या ‘शॉर्टकट रोमिओ’ या बॉलिवूड चित्रपटातूनही त्यांना झळकण्याची संधी मिळाली. नीलिमा परांडेकर या मराठी सृष्टीत फारशा रमल्या नसल्या तरी हिंदी मालिकांमधून त्यांनी उत्तमोत्तम भूमिका साकारल्या त्याचमुळे त्यांना हिंदी सृष्टीतही चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. मागील वर्षी वैभव मांगले अभिनित “अलबत्या गलबत्या” नाटकाच्या प्रयोगाला त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्या आपले पती आणि मुलीलाही सोबत घेऊन आल्या होत्या. मराठी सृष्टीपासून दुरावलेल्या नीलिमा परांडेकर ह्या पुन्हा एकदा मालिका किंवा चित्रपटातून पाहायला मिळाल्यास प्रेक्षकांनाही निश्चितच आनंद होईल हे वेगळे सांगायला नको.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *