nivedita saraf anknow

निवेदिता जोशी सराफ यांनी मराठी चित्रपट, मालिका तसेच नाटक अशा विविध क्षेत्रातून नेहमीच चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपट आणि हिंदी मालिकांमधूनही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. सध्या झी वाहिनीवर सुरु असलेली अग्गबाई सासूबाई हि मालिकादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली पाहायला मिळाली. त्या जशा एक उत्कृष्ट अभिनेत्री आहेत त्याचप्रमाणे त्या एक उत्तम कुक तसेच यशस्वी बिजनेसवुमन देखील आहेत. आज त्यांच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत..

nivedita saraf with sister
nivedita saraf with sister

१. लग्नाचा किस्सा- निवेदिता आणि अशोक सराफ यांच्या लग्नाचा किस्सा बहुतेकांना माहीत नसावा. चित्रपटातून एकत्रित काम करत असताना निवेदिता जोशी ह्या अशोक सराफ यांच्या प्रेमातच पडल्या होत्या याची जराशी चाहूल त्यांच्या इतर सहकलाकारांनाही लागली होती. निवेदिता जोशी आणि अशोक सराफ हे त्या काळात मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार असल्याने ते मुंबईत लग्न करतील असे सगळ्यांना वाटत होते. पण त्यांनी लग्न मुंबईला न करता गोव्यात केले होते. निवेदिता यांची थोरली बहीण ‘डॉ मीनल परांजपे’ यांच्या मध्यस्थीने हे लग्न अगदी एकांतात गोव्यातील मंगेशीच्या देवळात पार पडले होते. मंगेशी हे अशोक सराफ यांचे कुलदैवत असल्याने त्या दोघांनी गोव्याला जाऊन मंगेशीच्या देवळात जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

Nivedita Saraf recipes
Nivedita Saraf recipes

२. स्वतःचे युट्युब चॅनल- अभिनयाव्यतिरिक्त निवेदिता सराफ यांना जेवण बनवण्याची आणि ते खाऊ घालण्याची भयंकर आवड आहे. मुलगा अनिकेतच्या जन्मानंतर त्याच्या पालनपोषण करण्यातच त्यांनी स्वतःला गुंतवून घेतले होते त्यामुळे काही काळ त्या अभिनयापासून थोड्याशा दूरावल्या होत्या. हीच आवड जोपासत त्यांनी नुकतेच स्वतःच्या नावाचे युट्युब चॅनल सुरू केले आहे. ‘Nivedita Saraf recipes’ नावाने सुरू केलेल्या या युट्युब चॅनलला अल्पावधीतच उत्तम प्रतिसाद मिळत असून आजवर त्याला ६१ हजाराहून अधिक जणांनी सबस्क्राईबसुद्धा केले आहे.

aniket telifilms
aniket telifilms

३. स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस – निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांच्या मदतीने स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस उभारले होते. याची जबाबदारी स्वतः निवेदिता सराफ यांनी सांभाळली होती. ‘अनिकेत टेलिफिल्म्स’ नावाने सुरू केलेल्या या निर्मिती संस्थेमधून त्यांनी ‘टन टना टन’ ( मराठी) आणि काही हिंदी मालिकाही केल्या. परंतु २०१२ साली मुंबई पुणे एक्सप्रेसने जात असताना तळेगाव येथे अशोक सराफ यांचा मोठा ऍक्सीडेंट झाला. यानंतर मात्र अनिकेत टेलिफिल्म्सकडे त्यांचे अनावधानाने दुर्लक्ष होत गेले. आणि कालांतराने ‘अनिकेत टेलिफिल्म्स’ हे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस बंद पडले.

hansgamini sarees
hansgamini sarees

४. हंसगामीनीचा लाखोंची उलाढाल असलेला बिजनेस- अशोक सराफ यांनीच त्यांच्या बिजनेसला ‘हंसगामीनी’ हे नाव सुचवले होते. हंसगामीनी या ब्रँड खाली त्यांनी स्वतः डिझाइन केलेल्या साड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. गेल्या १६ वर्षांपासून त्या साड्यांच्या या व्यवसायातून लाखोंची उलाढाल करत आहेत. अनेक मराठी सिनेअभिनेत्री ह्या ब्रॅण्डशी जुळल्या गेलेल्या पाहायला मिळतात. मराठमोळ्या शैलीतील ह्या सुंदर सांध्यांना महिला तसेच युवा मुलींकडूनदेखील चांगला प्रतिसाद मिळतो.

nivedita saraf family pics
nivedita saraf family pics

५. फिरायला जाण्याची आवड- जेवण बनवण्याची, अभिनयाची , बिजनेस अशा विविध आवडी निवडी जोपासत असताना वेळात वेळ काढून निवेदिता सराफ यांना कुटुंबासोबत फिरायला जायची देखील आवड आहे. धार्मिक स्थळे, ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देणे त्यांना खूप आवडते. वेळ आणि आवड असली की अशा गोष्टींचा योग जुळून येतोच असे त्यांचे म्हणणे आहे. फक्त भारतातच नाही तर अनेक परदेशवाऱ्या देखील त्यांनी केलेल्या पाहायला मिळतात. पती अशोक सराफ आणि मुलगा अनिकेत सराफ ह्या संपूर्ण फॅमिलीसोबत त्यांनी अनेक देश विदेश फिरले असल्याचे त्यांच्या फेसबुक वरील फोटोंमधून पाहायला मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *