“निरमा गर्लच्या” वेशातील हा फोटो आहे एका मराठी अभिनेत्रीचा…जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री?

निरमा वॉशिंग पावडरच्या पुड्यावरील “निरमा गर्ल” बद्दल आजवर तुम्ही अनेकवेळा वाचले, ऐकले असेल. परंतु याचीच प्रचिती लक्षात घेऊन एका मराठी अभिनेत्रीने तशाच वेशातील आपला एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या या फोटोमुळे तिच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे ही नवी निरमा गर्ल नेमकी कोण असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, चला तर मग जाणून घेऊयात ही अभिनेत्री नेमकी कोण आहे आणि तिने हे असे का केले आहे ते…

लिटिल थिंग्स, गर्ल इन द सिटी मधून नावारूपास आलेली ही अभिनेत्री आहे “मिथिला पालकर”. नुकताच मिथिलाने तिच्या इन्स्टाग्रामवरून निरमा गर्लच्या वेशातील एक फोटो शेअर केला आहे. बॉलिवूड अभिनेता अभय देओल सोबत मिथिला एका “चोपस्टिक” नावाच्या सिनेमात झळकणार आहे. येत्या ३१ मे रोजी नेटफ्लिक्स वर हा सिनेमा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा टिझर लॉन्च झाला त्यात तिच्या नव्याकोऱ्या गाडीत अभय देओल सोबत बकऱ्या देखील कोंबलेल्या पाहायला मिळाल्या. यातून पुढे चित्रपटाचे कथानक कसे रंजक होत जाते आणि मिथिलाची नविकोरी गाडी कशी हरवते, तिच्या शोधकार्यात आणखी कोणकोणती धमाल उडते, अशा स्वरूपाचे हे कथानक असल्याचे बोलले जाते. त्यामुळे मिथिलाच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहण्यास सज्ज आहेत.
मिथिलाने यात निरमा नावाच्या मुलीची भूमिका साकारलेली पाहायला मिळणार आहे. त्यामुळेच तिने शेअर केलेल्या फोटो सोबत असा संबंध जोडला जात आहे. ही निरमा गर्ल “चोपस्टिक” सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना किती भावते हे पाहणे आता रंजक होणार आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *