निखिल चव्हाण म्हणजेच विक्या “या” सुंदर अभिनेत्रीला करतोय डेट…पुण्याच्या ” या” मंदिरात झाली होती पहिली भेट

“लागींर झालं जी ” मालिकेतील विक्या म्हणजेच अभिनेता निखिल चव्हाण सध्या या मालिकेत काम करत नसला तरी वेगवेगळ्या कारणामुळे तो प्रकाशझोतात आलेला पाहायला मिळतो. त्याचे फिटनेस असो किंवा वेबसिरीज याच्या माध्यमातून तो नेहमीच चर्चेत राहिलेला पाहायला मिळाला आहे.नुकतीच त्याची एक वेबसिरीज ची चर्चा पाहायला मिळत आहे. ‘शुद्धदेशी मराठीच्या’ “स्त्रीलिंग पुल्लिंग” या वेबसिरीज च्या माध्यमातून तो पुन्हा प्रेक्षकासमोर येत आहे. पण सध्या तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

याच वेबसिरीज मधील अभिनेत्री भाग्यश्री आणि निखिल यांची जोडी पाहायला मिळत आहे. परंतु या दोघांमधील बॉंडिंग काहीतरी वेगळेच दर्शवत आहे.याला कारणही तसेच आहे निखिल ने त्याच्या इन्स्टाग्राम वरून भाग्यश्री चा फोटो शेअर करत something… something… something असे म्हणत हार्टस चे कॅप्शन दिले आहे. एवढेच नाही तर निखिल आणि भाग्यश्री बऱ्याचवेळा सोबत वेळ घालवताना देखील दिसले आहेत. त्यामुळे या दोघांमधील प्रेम खुलू लागले असल्याचे समोर येत आहे. निखिलने यापूर्वी अनेक स्टेज शो साकारले असले तरी त्याला लागींर झालं जी ह्या मालिकेतूनच खरी प्रसिद्धी मिळाली असल्याचं तो सांगतो. निखिलने लागींर झालं जी मालिकेतील विक्याची भूमिका (फौजी) साकारलेली आपण पाहिली.

लोकमतला दिलेल्या मुलाखतीत निखिल चव्हाण याने असे म्हटले आहे कि, पुण्यातील महालक्ष्मी मंदिरात या दोघांची भेट झाली होती. त्यावेळी निखिल “लागींर झालं जी” मालिका साकारत होता. निखिल मूळचा पुण्यातील हडपसर येथे राहतो पण कामानिमित्त तो त्यावेळी साताऱ्यात स्थायिक होता तरीदेखील तिला भेटण्यासाठी तो वारंवार पुण्यात येत असायचा. भाग्यश्री न्हाळवे ही सासवड येथील असल्याचे निखिलने एका मुलाखतीत सांगितले. भाग्यश्री ने “कुंकू टिकली आणि टॅटू” मालिकेत रमा ची भूमिका साकारली आहे. आता दोघेही या वेबसिरीज च्या माध्यमातून एकत्रित येताना दिसत आहेत.
निखिलने भाग्यश्रीचा शेअर केलेला फोटो आणि कॅप्शन सगळे काही सांगून जातो. यामुळे त्यांच्या चाहत्यांनी देखील त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *