नाना पाटेकर यांच्या फॅमेलीचे फोटो आणि माहिती नक्की पहा

नाना पाटेकर यांचा जन्म जानेवारी १, इ.स. १९५१ रोजी मुरुड-जंजिरा, महाराष्ट्र येथे झाला. नाना मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’चे विद्यार्थी आहेत. नानांना स्केचेस बनवण्याचा शौक होता. गुन्हेगारांच्या वर्णनावरून नानांनी त्यांची रेखाचित्रे करून दिली आहेत. या कलाशिक्षणाच्या काळात नाना कॉलेजच्या नाटकांत कामे करू लागले.

सुप्रसिद्ध कलाकार नाना पाटेकर यांच्या रियल लाइफ बद्दल जाणून घेऊयात. दिनकर पाटेकर आणि संजना पाटेकर हे नानांचे आई वडील. नाना पाटेकर यांचे लग्न अभिनेत्री नीलकांती यांच्या सोबत झाले. लग्नाच्या वेळी नाना 27 वर्षाचे होते. नीलकांती यांच्या सोबत नानांनी लव्हम्यॅरेज केले होते. नीलकांती या ब्राम्हण तर नाना मराठा आहेत.

लग्नाच्या वेळी नाना महिन्याकाटी 750 रुपए कमवायचे तर नीलकांती या एका बँकेत नोकरीला असताना त्यांना त्या काळात दरमहा 2500 हजार रुपए पगार होता. तुला जे काम करायचे ते कर मी घर सांभाळेन असे नीलकांती मला म्हणाली होती म्हणून मी आज जो काही आहे तो नीलकांती मुळेच आहे असे नाना सांगतात. नाना याचे वैवाहिक आयुष्य फारसे आनंदी राहिले नाही, काही काळ त्यांच्या पत्नी पासून विभक्त राहत होते.

आता नाना आणि नीलकांती एकत्र दिसतात नीलकांती या सुधा एक अभिनेत्री आहेत त्या सध्या गोठ या मध्ये झळकताना दिसतात. नाना यांचा एक मुलगा आहे त्याचे नाव मल्हार पाटेकर आहे. मल्हार च्या जन्मापूर्वी नाना आणि नीलकांती यांना आणखीन एक मुलगा झाला होता पण तो फार काळ जगू शकला नाही.


१९८९मध्ये आलेल्या परिंदा चित्रपटात नानांची खलनायकाची भूमिका अफाट गाजली. १९९२मध्ये तिरंगा या चित्रपटाद्वारे नाना पाटेकरांना प्रमुख भूमिका करावयाचा पहिल्यांदा मान मिळाला. आपल्या संवादफेकीमुळे नाना पाटेकर यांनी संवाद शैलीकरिता प्रसिद्ध असलेल्या त्या चित्रपटातील राजकुमार यांच्या तोडीस तोड अभिनय केला. २०१४ मधील ‘प्रकाश बाबा आमटे’ आणि ‘नटसम्राट’ या चित्रपटाने त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *