नानांच्या क्लीनचिट बाबत तनुश्री दत्ता म्हणतीये , ” जर मि चार जनांविरोधात… ” नानाची पीआर टीम कारणीभूत

तनुश्री दत्ता हीने “हॉर्न ओके प्लीज ” या चित्रपटाच्या चित्रिकरणा वेळी नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनुक तसेच लैंगिक छळ केले असल्याचे आरोप लावले होते. त्या संदर्भात तिने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन कायदेशीर तक्रार देखील नोंदवली होती. नुकताच या संदर्भात पोलिसांनी सर्व साक्षीदारांचा जबाब घेऊन नानांना क्लीन चिट दिले असल्याच्या बातम्या सोशल मिडियावर पसरत आहेत. त्यामुळे तनुश्रीने या वादात पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मुम्बई पोलिसांनी नानांना क्लीन चिट दिल्या असल्याच्या बातम्या खोट्या असल्याचे तिचे म्हणने आहे. या सर्व बातम्या पसरवण्यामागे नानाची पीआर टीम कारणीभूत आहे.

इंडस्ट्रीत काम मिळावे म्हणूनच नानानी है सर्व खटाटोप केले असल्याचे तिचे म्हणणे आहे. शिवाय या प्रकरणात मी नाना पाटेकरसह, गणेश आचार्य, सामी सिद्दिकी, दिग्दर्शक राकेश सारंग या चौघांवर गुन्हा नोंदवला आहे, मग केवळ नानांनाच क्लीन चिट कशी काय मिळू शकते? असाही सवाल तिने केला आहे.
या प्रकरणातील साक्षीदारांनाही धमकावले जात असल्याचे तिने स्पष्ट सांगितले आहे. त्यांना घाबरवून त्यांच्याकडून खोटे पुरावे गोळा केले जात आहेत. मला न्याय मिळण्यासाठी कितीही वेळ लागला तरी चालेल पण माघार घेणार नाही. लवकरच वकील नितिन सातपुते पत्रकार परिषदेतुन या सर्व घटनेचा उलगड़ा करणार असल्याचे तिने स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे हे प्रकरण आणखी किती दिवस चिघळत राहणार आहे हे तुर्तास सांगणे कठिन आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *