सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील अनेक गावे पूरग्रस्त झाली आहेत. सर्वच स्तरातून जीवनावश्यक वस्तूंची मदत त्यांच्यापर्यंत पुरवली जाताना दिसत आहे. यातच सुबोध भावेने देखील गुरुवारी झालेल्या “अश्रूंची झाली फुले” या नाटकाच्या जमा झालेल्या तिकिटांची सर्व रक्कम गरजूंसाठी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.काही दिवसांपूर्वी सुबोधने या ठिकाणी आपल्या नाटकांचे दौरे आयोजित केले होते परंतु पूरस्थिती वाढत चालल्याने तिथे नाट्य प्रयोग घेण्याचे थांबवण्यात आले असल्याचे स्पष्ट सांगितले होते.

चाहत्यांना विश्वासात घेऊन तुम्ही अगोदर यातून सुखरूप बाहेर या आपण पुन्हा भेटू अशा आशयाचा व्हिडीओ शेअर केला होता त्याच्या या वक्तव्यावर ‘ कधीतरी कोणाला मदत करा ‘ अशा स्वरूपाच्या टीका केल्या होत्या. या टीकेला सडेतोड उत्तर देत त्याने आपल्या नाटकाच्या तिकिटांची रक्कम पुरग्रस्तांसाठी देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याच्या या निर्णयाचे अनेक चाहत्यांनी स्वागतच केलेले पाहायला मिळते शिवाय यासोबत इतरही कलाकारांनी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. जीवनावश्यक लागणाऱ्या सर्वच वस्तू आम्ही या पुरग्रस्तांपर्यत शक्य तितक्या तातडीने पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. टीकाकारांसाठी सुबोधचे हे उत्तर निश्चितच स्तुत्य म्हणावे लागेल तशाच स्वरूपाची अपेक्षा कलाकारांकडूनहि करणे यात गैर काहीच नाही. त्याच्या ह्या उत्तराने मराठी कलाकारांकडूनही आणखी मदत वाढण्याची शक्यता आहे तशा स्वरूपात त्यांच्याकडून पावले देखील उचलण्यात आली आहेतच. यासोबतच कोणाला मदत हवी असल्यास अथवा कोणाला मदत करायची असल्यास आमच्या टीमशी संपर्क साधण्याचे आवाहन त्याने केले आहे. त्यामुळे पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आता सुबोध भावेसह मराठी सिने सृष्टीही मागे नाही तर ती रसिकांच्या सोबत आहे हे दिसून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *