dhanashree kadgaonkar pic

तुझ्यात जीव रंगला मालिकेत नंदिता वहिनीसाहेब ही भूमिका गाजवणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने आपल्या आयुष्यातील सर्वात आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. धनश्रीने आपल्या नवऱ्याच्या दिवेश देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज सोशल मीडियावरून ‘कुणीतरी येणार येणार गं…’ असे म्हणत प्रेग्नंट असल्याची बातमी एका खास व्हिडीओ द्वारे सांगितली आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून धनश्रीने एक्झिट घेतली होती. त्यानंतर ती डान्सच्या रिऍलिटी शोमध्ये झळकली होती.

dhanashree kadgaonkar
dhanashree kadgaonkar

नंदिता अर्थात तुझ्यात जीव रंगला मालिकेतील वहिणीसाहेब ही भूमिका तिने आपल्या सजग अभिनयाने चांगलीच गाजवली होती. ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या शोमधून धनश्री अभिनय क्षेत्रात उतरली. इथूनच तिच्या कारकिर्दीची खरी सुरुवात झाली असे म्हणायला हरकत नाही. ” चिठ्ठी” हा तिचा पहिला मराठी चित्रपट यात तिला प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. याशिवाय गंध फुलांचा गेला सांगून, माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकातून तिने छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या होत्या तसेच झोपी गेलेला जागा झाला, आधी बसू मग बोलू हे नाटकही तीने अभिनित केले आहे. मात्र या सर्व भूमिकांमधून तुझ्यात जीव रंगला मालिकेतील वहिनीसाहेब ही भूमिका खूपच चर्चेत राहिली ही भूमिका विरोधी जरी असली तरी ही भूमिका तिच्या आयुष्यात अधोरेखित करणारी ठरली होती. आज ती मालिकेतून दिसत नसली तरी सोशल मीडियावर ती नेहमीच ऍक्टिव्ह असते. यातूनच आज तीने आपल्या आयुष्यातील महत्वाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली.तिच्या या बातमीने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *