सध्या बायोपिक चा ट्रेंड जोरात सुरू आहे बाळासाहेब ठाकरे , मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित बायोपिक “ठाकरे आणि द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर” या वर्षीचे राजकीय वर्तुळातील चित्रपट बहुचर्चित ठरले आहेत. त्यामुळे पंतप्रधाने नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरही चित्रपट बनवला जात असल्याचे वृत्त हाती आले आहे. नरेंद्र मोदी गेल्या निवडणुकीतील सर्वात दांडगे व्यक्तिमत्त्व असल्याने हा चित्रपट चांगलाच चालेल असे जाणकारांचे मत आहे.

“बॉलिवूड लाईफ” यांच्या वृत्तानुसार लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या भागात चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. चित्रपटात नरेंद्र मोदी यांची व्यक्तिरेखा बॉलिवूड अभिनेता “विवेक ओबेरॉय” हा साकारणार असल्याची माहिती समोर येत आहे. विवेक ओबेरॉय याने आजवरची ही एक सर्वात आव्हानात्मक भूमिका असल्याचे सांगितले आहे. चित्रपटाचे नाव आणि आणखी कोणकोणते कलाकार या चित्रपटात काम करणार हे येत्या काही काळातच स्पष्ट होईल. चित्रपटाच्या दिग्दर्शकाची धुरा उमंग कुमार हे सांभाळणार आहेत. त्यामुळे लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनपट प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल.
राजकीय वर्तुळातही नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर चित्रपट बनत असल्याने वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे, पण नरेंद्र मोदी यांची पूर्वी इतकी हवा राहिली नाही हेही तितकंच खरं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *