धनोत्रयोदशीवर राज ठाकरे यांनी पुन्हा केले आपले मत व्यक्त त्यांच्या खास शैलीत.. त्यांचं व्यंगचित्र नक्की पहाच

बाळासाहेब ठाकरे ज्याप्रकारे व्यंगचित्रांच्या साहाय्याने आपला रोष व्यक्त करायचे अगदी त्याच प्रमाणे राज ठाकरेही आपला रोष सोशिअल मीडियावर आपल्या खास व्यंगचित्रांच्या माध्यमातून व्यक्त करताना नेहमीच पाहायला मिळतात. दिवाळी आणि पण अच्छेदिन मात्र अजून आली नाही गेली ४ वर्ष आपण अच्छे दिन ची वाट पाहतोय पण अच्छे दिन तर सोडाच थोडेफार चांगले दिवस होते तेही आता राहिले नाही असं अनेकांचं मत आहे. राज ठाकरे यांनी ह्यावर नुकतच ह्यावर एक रेखाटन केलय.

धनोत्रयोदशी हा दिवस अनेकप्रकारे साजरा केला जातो, वैद्यकीय शास्त्राचा देव म्हणून ओळखला जाणारा “धन्वंतरी” यांचा हा जन्मदिवस म्हणूनही काही लोक हा दिवस महत्वाचा मानतात. असे सांगत संपूर्ण भारत देश आता ICU मध्ये दाखवला असून धन्वंतरी देव बाहेरील लोकांना म्हणजेच जनतेला सांगतॊय कि काळजी करायचं काही कारण नाही. भारत देशावर राजकारणातून गेली ४ साडेचार वर्ष खूप अत्याचार झालेत. पुढच्या निवडणुकीत दूध का दूध और पाणी का पाणी होईल.
गेल्या काही दिवसांत राजसाहेबांनी काढलेल्या सगळ्या चित्रांमध्ये त्यांनी बीजेपी वर आणि मोदी सरकारवर चांगलाच निशाणा साधलाय. त्यांच्या प्रत्येक चित्रातून ते सरकारवरील रोष दाखवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतंय.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *