धक्कादायक!!! हि प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाआधीच बनली आई फोटो पाहून आश्चर्य चकित व्हाल

देव डी चित्रपटातील सुंदर अभिनेत्री माही गिल गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत येऊ लागली आहे. तसे पाहता बरेच कलाकार काम मिळवण्यासाठी आपले लग्न झाले नसल्याचे सांगताना दिसतात. हा एक प्रसिद्धीचाच भाग म्हणावा लागेल. त्याच प्रमाणे माही गिल या अभिनेत्रीने देखील आपण रिलेशनशिप मध्ये असल्याचे लपवले होते. एवढेच नाही तर लग्न न करूनही तिला अडीच वर्षांची मुलगी असल्याचा धक्कादायक खुलासा तिने केल्याने सोशल मीडियावर खळबळ माजली आहे.

माही गिल हिने देव डी चित्रपटात पारोची भूमिका साकारली होती. याव्यतिरिक्त तीने ‘साहेब बिवी और गुलाम’, ‘नॉट अ लव्ह स्टोरी’ सारखे चित्रपट साकारले. आपल्या बोल्ड भूमिकेमुळे ती कायमच चर्चेत राहिली आहे. फॅमिली ऑफ ठाकूर गंज या तिच्या आगामी प्रोजेक्ट संदर्भात तिने एक मुलाखत दिली त्यात ती अविवाहित असली तरी मी बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले आहे. माहि गिलने आपले खाजगी आयुष्य मिडियापासून लपवले आहे त्यामुळे हा खुलासा तिच्या चाहत्यांसाठी निश्चितच धक्कादायक होता. माहीला अडीच वर्षाची मुलगी देखील आहे. माझे लग्न झाले असो वा नसो आम्ही दोघेही आमची जबाबदारी अतिशय चोख बजावत आहोत. आम्ही दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे तिने म्हटले आहे. तिने मुलीला जन्म दिलाय का ती दत्तक घेतली आहे याबाबत तिने काहीच सांगितले नाही. पण माझी मुलगी अमच्यासोबतच राहत आहे. सध्या कामामुळे केअरटेकर तिची काळजी घेत असली तरी एक आई म्हणूनही तिची जबाबदारी मी घेत आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *