marathi actor no more

झी मराठीवरील “स्वराज्यरक्षक संभाजी” ही मालिका अवीस्मरणीय ठरली आहे. ही मालिका संपली असली तरी त्यातील कलाकार आपल्या सजग अभिनयाने स्मृतीत राहतात हे विशेष. याच मालिकेत कोंडाजी बाबांना जंजिऱ्यावर घेऊन जाणाऱ्या अब्दुल्ला दळवीची भूमिका साकारली होती “प्रशांत लोखंडे” या कलाकाराने. खरं तर ही भूमिका देखील तितक्याच ताकदीने उभारली असल्याने अब्दुल्ला रसिकांच्या स्मरणात राहतो. त्यांच्या “बाद में कटकट नको” या डायलॉगवरून ते चांगलेच गाजलेले पाहायला मिळाले. प्रशांत लोखंडे यांनी “स्वराज्यजननी जिजामाता” या मालिकेतही काम केले आहे.

actor prashant
actor prashant

या हरहुन्नरी कलाकाराने खूप कमी वयातच एक्झिट घेतले असल्याचे समोर येत आहे. नुकतेच त्यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले असून ही बाब त्यांच्या मित्र परिवार आणि सह कलाकारांना नक्कीच धक्का देणारी आहे. प्रशांत लोखंडे हे दादर, मुंबईचे. इथेच त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. सिद्धार्थ कॉलेज मधून त्यांनी आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. या दरम्यान रंगभूमीवर त्यांचे पदार्पण झाले. एकांकिका, नाटक, मालिकांमधून त्यांनी विविधांगी भूमिका साकारून रसिकांचे मनोरंजन केले. ‘मुंबईचे कावळे’, ‘भगदाड’, ‘साडू ,साडूची बायको आणि उरलेले जग’, ‘जंगल में मंगल ‘ अशा विविध नाटक एकांकिका गाजवून छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये त्यांनी प्रवेश केला. तू माझा सांगाती (काशाबा), ग्रहण, मोलकरीण बाई या मालिकेत छोट्या मोठ्या भूमिका मिळत गेल्या. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून अब्दुल्लाची भूमिका त्यांनी अगदी सुरेख बजावलेली पाहायला मिळाली. त्यांची ही भूमिका रसिकजनांच्या कायम स्मरणात राहील एवढे मात्र नक्की …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *