धक्कादायक! मासळी जास्त काळ टिकावी म्हणून जे वापरतात त्यामुळे तुमचा जाऊ शकतो जीव

आपल्याकडे मासे खाणारे शौकीन अनेक आढळतील, परंतु गोव्यामध्ये नुकतीच या मासळीची चाचणी करण्यात आली. यात अशी मासळी खाल्याने कर्करोगालाही सामोरे जावे लागतील असे घटक आढळून आले आहेत. त्यामुळे तूर्तास गोव्यात आयात केल्या जाणाऱ्या मासळीवर बंदी घालण्यात आली आहे. या मासळीत ‘फॉर्मलीन ‘ नावाचे रसायन आढळून आल्याने गोव्यातील सरकारने या आयातीवर बंदी घातली आहे. फॉर्मलीन हे एक असे रसायन आहे ज्याच्या वापराने मासळी अधिक दिवस ताजी आणि टवटवीत राहते.

तसे पाहता मृत व्यक्तीचा देह अधिक काळ टिकावा म्हणून बर्फाच्या लाद्यांचा वापर करण्यात येतो. परंतु ही प्रोसेस अधिक खर्चिक वाटत असल्याने फॉर्मलीन नावाच्या रसायनाचा वापर सर्रास होताना दिसतो. यामुळे मृत शरीर अधिक काळ तर टिकून राहतेच शिवाय होणारा खर्चही आटोपशीर झाल्याने हा पर्याय सोईस्कर ठरत आहे.
परंतु काही व्यापारी मासळी जास्त काळ ताजी वाटावी म्हणून या रसायनाचा वापर करताना दिसत आहेत. त्यामुळे या घटना मासळी खाणाऱ्यांच्या जीवावर बेतत आहेत. याचीच पडताळणी व्हावी म्हणून तामिळनाडू आणि केरळमध्ये ‘सागर पाणी’ या योजनेअंतर्गत असे मासे सापडल्याचे आढळून आले आहे. याचाच परिणाम म्हणून गोव्यामध्ये मासळी आयातीवर थोडे दिवस बंदी घालण्यात आली आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *