धक्कादायक! फिट येत असतानाही ह्या मराठी अभिनेत्रीला करायला लावला होळीत रंगाने माखण्याचा सिन.. एक नाही तर तब्बल ५ वेळा

मराठी सृष्टीतील छोटा पडदा असो वा मोठा, आजवर अनेक कलाकारांनी आपले चांगले आणि वाईट अनुभव नेहमीच शेअर केलेले पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वीच स्पृहा जोशीने देखील असा वाईट अनुभव सोशल मीडियावर व्यक्त केलेला पाहायला मिळाला. जाड झाल्यामुळे सृहाला अनेक दिग्दर्शकांनी डावलले असल्याचा अनुभव तिने सांगितला होता. त्यापाठोपाठ एका वेगळ्याच कारणामुळे आणखी एक अभिनेत्री अशा वाईट अनुभवाला सामोरी गेलेली पाहायला मिळाली.

“तुझं माझं ब्रेकअप” मालिकाफेम ‘केतकी चितळे’ हिला देखील असा वाईट अनुभव अनुभवायला मिळाला आहे. केतकी चितळे “लक्ष्मी सदैव मंगलम ” मालिकेत काम करत होती. होळीचे निमित्त साधून मालिकेत तिला रंगवण्यात आल्याचा सिन करायचा होता. तिची स्किन खूपच सेन्सेटिव्ह असल्याचे मालिकेच्या असिस्टंट डायरेक्टरला तिने सांगितले होते. केतकीच्या ह्या बोलण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. मालिका साकारण्याआधिच तिने फिट येत असल्याचे सांगितले होते. दिवसातून किमान पाच वेळा तिला फिट आली. असे तीन दिवस सलग झाल्याने मालिकेच्या निर्मात्यांनी तिला याबाबत खडेबोल सुनावले.
खरं तर मालिका हातात घेण्याआधिच तिने फिट येत असल्याचे सांगितले होते. उलट केतकी एका आजारपणाला सामोरी जात असल्याचा कांगावा करत तिला तुच्छ वागणूक दिली आणि अचानक एक दिवस व्हाट्सअप द्वारे मेसेजने मालिकेतून काढून टाकल्याचे तिला कळवण्यात आले. यासर्व घटनेचा निषेध व्यक्त करून हे लोक माझ्याशी एवढे वेगळे कसे वागू शकतात असा एक व्हिडिओ तिने आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. तिच्या ह्या व्हिडिओला असंख्य चाहत्यांनी रिप्लाय देत तिची बाजू योग्य असल्याचे सांगितले. तर निवेदिता सराफ यांनी देखील कमेंटद्वारे तिच्या या लढ्याला पाठिंबा दिला आहे. केतकीने याआधी झी वाहिनीची तुझं माझं ब्रेकअप ही मालिका साकारली होती. तिने साकारलेल्या ह्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. तिच्या चाहत्यांनी देखील कमेंट द्वारे याची आठवण करून दिली. “फिट” येत असल्याने एका अभिनेत्रीला असे डावलणे हे योग्य नसल्याचे अनेकांनी आपले मत मांडले.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *