धक्कादायक! तुझ्यात जीव रंगला मालिकेतील रानांबद्दलची महत्वाची बातमी झाली लीक…प्रेक्षकांची होणार हिरमोड

ऑगस्ट २०१६ पासून झी मराठी या वाहिनीवर “तुझ्यात जीव रंगला” ही मालिका प्रसारित होत होती. अंजली आणि रणादा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या आणि कोल्हापुरी बाज असलेल्या कथानकावर प्रेक्षकांनी अपार प्रेम दिले. त्यामुळेच ह्या मालिकेने आजवर तग धरून ठेवलेला पाहायला मिळतो. मालिकेतील वहिणीसाहेब, सूरज, चंदा, गोदाक्का, बरकत हे देखील महत्वाची धुरा संभाळताना दिसले. परंतु नुकतीच एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. ती म्हणजे मालिकेचे प्रमुख पात्र “राणादा ” एक्झिट घेत असल्याचे.

मालिकेतील राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी मालिकेतून एक्झिट घेत असल्याची बातमी लीक झाली आहे. यामागे नेमके कोणते कारण आहे हे मात्र अजून स्पष्ट झाले नाही. हार्दिक ही मालिका पुढे साकारत नसल्याने प्रेक्षकांपुढे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मालिकेत राणादाचा मृत्यू होत असल्याने मालिकेला वेगळे वळण मिळणार आहे. त्यामुळे राणादा हे पात्र यापुढे मालिकेत पाहायला मिळणार नसल्याचे चित्र समोर दिसत आहे. लवकरच मालिकेतील हा बदल प्रेक्षकांना येत्या काही भागात पाहायला मिळणार असल्याचे बोलले जाते. जर राणादा मालिकेतून एक्झिट घेणार असेल तर मालिकेच्या भवीतव्याबाबत साशंकता निर्माण होणार.
हार्दिक जोशी ही मालिका का सोडत आहे याचा अजून खुलासा झाला नसला तरी त्यामुळे मालिकेवर निश्चितच परिणाम होईल अशी चर्चा आता जोर धरताना दिसत आहे. याच कारणामुळे मालिकेत राणादा या पात्राचा मृत्यू दाखवला जाणार आहे. ही बातमी तुझ्यात जीव रंगलाच्या मालिकेच्या सेटवरून लीक झाल्याची माहिती समोर येत आहे. या बातमीत किती तथ्य आहे हे येत्या काही भागातच स्पष्ट होईल.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *