धक्कादायक! झी वाहिनीची आणखी एक मालिका प्रेक्षकांचा घेणार निरोप…पहा कोणती आहे मालिका

झी वाहिनीवरील सर्वच मालिकेने आपापला एक स्वतंत्र चाहतावर्ग तयार केला आहे. त्यामुळे आजवर झी च्या बहुतेक मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलेल्या पाहायला मिळाल्या. नुकतीच तुला पाहते रे ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याच्या बातम्या हाती येतात न येतात तोच आता झी वहिनीची आणखी एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे समोर येत आहे. प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेत असलेली ही मालिका आहे “लागीरं झालं जी”…

होय लागीर झालं जी ही मालिकादेखील आता लवकरच शेवटच्या टप्प्यावर येत असल्याने मालिकेची एक्झिट घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. मालिकेच्या सेटवरूनच ही बातमी लीक झाल्याने ह्या बातमीत तथ्य असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या मालिकेचा चाहतावर्ग काहीसा नाराज होणार आहे. मालिका वाढवत बसण्यापेक्षा ती लवकरात लवकर आटोपती घेण्यावर सध्या भर घातली जात आहे. कालच तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून राणादा एक्झिट घेत असल्याची बातमी पसरली त्यामुळे तुझ्यात जीव रंगला ही लोकप्रिय मालिका देखील लवकरच संपण्याची चिन्ह दिसून येणार आहे. त्यामुळे झी वहिनीच्या या ३ मालिका शेवटच्या क्षणापर्यंत येऊन पोहोचल्या आहेत असे म्हणायला हरकत नाही.
तुला पाहते रे या मालिकेच्या जागी “मिसेस मुख्यमंत्री” ही मालिका नव्याने येऊ घातली आहे. त्यामुळे या नव्या मालिका आता प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. लगीर झालं जी मालिकेतिला देखील शीतल, अजिंक्य,जिजी, मामी, जयडी, भैय्यासाहेब या सर्वानीच आपल्या अभिनयाने ही मालिका चांगलीच गाजवली होती.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *