marathi actor news

झी मराठी वाहिनीवरील “खुलता कळी खुलेना” या मालिकेतून अभिनेत्री मयुरी देशमुख प्रेक्षकांसमोर आली होती. या मालिकेतून मयुरीला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. मालिकेव्यतिरिक्त काही नाटकांतूनही तीने अभिनय साकारला आहे. मयुरी ही पेशाने डेंटिस्ट आहे. अभिनेता “आशुतोष भाकरे” यांच्याशी ती विवाहबद्ध झाली होती. धक्कादायक बाब म्हणजे मयुरी देशमुख चा पती आशुतोष भाकरे यांनी आज आपल्या नांदेड येथील राहत्या घरी गळ फा स घेऊन आ त्म ह त्या केली आहे.

marathi actor ashutosh
marathi actor ashutosh

आशुतोषणे आ त्म ह त्या का केली याचे कारण नेमके समजले नाही. परंतु गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्यात होता अशी प्राथमिक स्वरूपाची माहिती समोर येत आहे. आशुतोष भाकरे एक कलाकार आहे त्याने काही मराठी चित्रपट हि साकारले आहेत. आशुतोष भाकरे यांनी ‘ईच्यार ठरला पक्का’, ‘भाकर’ यासारख्या मराठी चित्रपटातून काम केले आहे. २१ जानेवारी २०१६ रोजी मयुरी देशमुख आणि आशुतोष विवाहबंधनात अडकले होते. हा त्यांचा प्रेमविवाह होता असे मयुरीने एका मुलाखतीत सांगितले होते. आशुतोषच्या आ त्म ह त्येच्या बातमीने मयुरीला देखील तितकाच धक्का बसला असून मराठी सृष्टीतही खळबळ माजलेली पाहायला मिळते आहे. त्याने असे टोकाचे पाऊल का उचलले? हाच प्रश्न अनेक कलाकारांनी देखील उपस्थित केला आहे. लॉ क डाऊन दरम्यान अनेकांना नैराश्याला सामोरे जावे लागले आहे आशुतोषची आ त्म ह त्या देखील याचाच भाग आहे की काय असे चित्र आता दिसत आहे आणि तशीच चर्चा देखील पाहायला मिळते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *