“तुझ्यात जीव रंगला” ह्या मालिकेने सध्या रंजक वळण घेतले आहे. काही दिवसांपूर्वी राणाची भूमिका साकारणारा हार्दिक जोशी मालिकेतून एक्झिट घेत असल्याची चर्चा होती. परंतु तो या मालिकेतून एक्झिट घेत नसल्याचे आता समोर येत आहे आणि तो आता एका वेगळ्या रूपात पुन्हा प्रेक्षकांसमोर येत आहे. राणादाच्या मृत्युनंतर मालिकेत आता “राजा राजगोंडा” नावाचे पात्र दमदार एन्ट्री घेताना दिसणार आहे. मालिकेत तो दाक्षिणात्य भाषा बोलत असल्याचे दर्शवले आहे. रांगडा, डॅशिंग आणि सगळ्यांना पुरून उरणारा हा राणा एका वेगळ्याच रुपात प्रेक्षकांसमोर येत आहे. त्याचे हे बदललेले रूप निश्चितच रंजक ठरणार असल्याने प्रेक्षक त्याच्या एंट्रीची आतुरतेने वाट पाहत आहेत.

राणादाच्या मृत्यूनंतर मालिकेचा कायापालट देखील झालेला पाहायला मिळाला. एकाच एपिसोड मध्ये मालिका तब्बल दोन वर्षे पुढे सरकलेली दिसत आहे. त्यामुळे राणादा गेल्यावर गावाचा पूर्ण कायापालट झाला आहे. सनिदा पूर्वीप्रमाणे दारूच्या आहारी गेलेला पाहायला मिळाला. वहिणीसाहेबांच्या धाकाने बरकतने देखील आता दुसरी नोकरी पत्करली आहे. लाडू देखील वहिनीसाहेबांच्या वागण्याला पुरता घाबरून गेला आहे. अंजली बाईंनी तर आपल्या सरपंच पदाचा राजीनामा देखील दिला आहे. सरपंच पदाची ही जबाबदारी आता वहिणीसाहेबांनी स्वीकारली आहे. त्यामुळे वहिणीसाहेबांचा दरारा आणखीनच वाढत चाललेला दिसतो. त्यांच्या हाताखालची नोकरमंडळी तर निमूटपणे त्यांनी सांगितलेली कामे पार पाडत आहेत. त्यात आता राणादा पुन्हा एकदा एन्ट्री घेत असल्याचे दिसून येत आहे. येत्या २८ तारखेला मालिकेत पुन्हा राजा राजगोंडा एन्ट्री घेणार असल्यामुळे मालिका एका रंजक वळणावर येऊन ठेपणार आहे. लवकरच हा नवा राणादा वहिणीसाहेबांना वठणीवर आणेल अशी आशा आता प्रेक्षक व्यक्त करत आहेत. कारण राणादाला आता वहिणीसाहेबांची कटकारस्थाने माहीत झाली आहेत. त्यांच्याचमुळे त्याला आपला जीव गमवावा लागला होता. हे सर्व तो जाणून असल्यामुळे मालिकेतील त्याच्या एंट्रीची सर्वच प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. भोळा भाबडा राणा आता वेगळ्या रूपात पाहायला मिळणार असल्याने मालिकेचा चाहतावर्ग खुश होणार एवढे नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *