दिवाळीत ‘किल्ला’ का बांधतात?…’अभ्यंगस्नान’का करतात? …जाणून घ्या सविस्तर

दिवाळी म्हटले की फराळ, फटाके, दिवे, अभ्यंगस्नान आलेच. यातूनच बालचमूनच्या अवडतीचा विषय म्हणजे किल्ला बनवणे. मग त्यासाठी लागणारी माती, दगड, विटा गोळा करणे हे आपसूकच येते. खरं तर दिवाळी हा सर्वात मोठा आणि आनंदाचा क्षण. परंतु हा सण साजरा करण्याची परंपरा सुरू झाली ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या काळात. गुलामगिरीतून सुटका मिळवून देऊन त्यांनी या सणाला विशेष रूप प्राप्त करून दिले. मग आतिषबाजी ,रोषणाईने अवघे स्वराज्य उजळून निघू लागले.

यातूनच आजच्या पिढीला स्वराज्य म्हणजे काय, किल्ला म्हणजे काय याची जाणीव निर्माण व्हावी यासाठी किल्ल्यांची संकल्पना पुढे आली. मग दारोदारी अगदी छोट्याशा जागेत देखील किल्ल्यांना आकार येऊ लागला. गडकोट, भुईकोट किल्ल्यावर बुरुज, तट, भुयार याची आखणी सुरू झाली. लहानग्यांच्या या आवडत्या गोष्टीत मोठ्यांनी देखील पुढाकार घेत व्यापक स्वरूप प्राप्त होऊ लागले. मग यातूनच वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित होऊ लागल्या. आपली संस्कृती, वारसा असाच पुढे चालू रहावा आणि महाराजांचे स्मरण व्हावे यानिमित्ताने किल्ल्यांची जडणघडण होऊ लागली.
याशिवाय दिवाळीत अभ्यंगस्नानाला देखील विशेष महत्त्व दिले जाते. कारण नुकताच पावसाळा संपून हिवाळ्याकडे वाटचाल सुरू झालेली असते. त्यामुळे मंदावलेली पचनक्रिया पुन्हा जोमाने कार्यास लागते. त्यामुळे जड आणि पोषक पदार्थ आवर्जून खाल्ले जातात.

असे न केल्यास वातदोषाचे विकार वाढीस लागून बद्धकोष्ठता आणि पोटाचे विकार उदभवण्याचा धोका जास्त बळावतो.त्यामुळेच दिवाळीत फराळाला विशेष महत्व दिले जाते. याशिवाय दिवाळीत शरीराला तिळाचे तेल लावल्याने देखील भरपूर फायदे मिळतात. तिळाचे तेल इतर तेलांच्या तुलनेत शरीरात लवकर मुरते. शिवाय यामुळे थंडीत आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होते.यामुळे पित्ताचा स्तरही कमी होऊन स्वास्थ्य टिकून राहते. शरीरावरील मृत त्वचा निघून जाऊन नैसर्गिक ओलावा प्राप्त होतो. त्यामुळे हिवाळ्यातील त्वचेचे सौंदर्य टिकून राहण्यास मदत मिळते . याशिवाय अभ्यंगस्नानात गरम तेल डोक्यावर ओतल्याने नर्व्हस सिस्टील दूर ठेऊन आलेला ताण कमी करण्यास मदतच मिळते. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकवून राहावे यासाठी शास्त्रात अभ्यंगस्नान आवश्यक मानले आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *