दिवंगत अभिनेते “सदाशिव अमरापूरकर” यांच्या मुलींचे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण… पत्नी आणि मुलींचे हे कधीही न पाहिलेले फोटो

मराठी हिंदी सिने सृष्टीतील दिग्गज खलनायक म्हणून “सदाशिव अमरापूरकर” यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. बॉलिवूडमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने अनेक अजरामर भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे आज ते हयात नसले तरी रसिकांच्या ते तितकेच स्मरणार राहतील यात शंका नाही. सदाशिव अमरापूरकर यांच्या दोन्ही कन्या देखील याच क्षेत्रात आपले नशीब आजमाऊ पाहत आहेत. त्यांची धाकटी मुलगी “रिमा अमरापूरकर” ‘पुरुषोत्तम ‘ या मराठी चित्रपटाची दिग्दर्शिका म्हणून समोर येत आहे.

तर थोरली मुलगी “केतकी अमरापूरकर” चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहे. नंदू माधव हे सहकलाकाराच्या भूमिकेत आहेत तर पूजा पवार, किशोर कदम, देविका दफतरदार हे कलाकार देखील चित्रपटात महत्वाची भूमिका बजावणार आहेत. विशेष म्हणजे सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी सुनंदा अमरापूरकर यांची प्रस्तुती असलेला हा चित्रपट येत्या १० मे रोजी राज्यभरात प्रदर्शित होणार आहे तर ११ मे हा सदाशिव अमरापूरकर यांचा जन्मदिवस आहे त्याचे औचित्य साधून हा चित्रपट या दिवशी प्रदर्शित करण्याचे ठरवले आहे. ” पुरुषोत्तम” चित्रपटाच्या निमित्ताने केतकी आणि रिमा अमरापूरकर मराठी सिने सृष्टीशी जोडल्या जाणार आहेत.
याआधी रिमा हिने nakusa नावाने डोकयुमेंट्री बनवली होती तिला पुरस्काराने गौरविण्यात आले होते. याशिवाय “बाजीराव मस्तानी” चित्रपटासाठीही तिने काम केले होते.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *