भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिली अभिनेत्री म्हणून “कमलाबाई गोखले” यांना ओळखले जात त्यांची आई दुर्गाबाई कामत या देखील एक बालकलाकार म्हणून नावारूपास आल्या होत्या. कमलाबाई गोखले यांना तीन अपत्ये त्यापैकी चंद्रकांत गोखले हे मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते. शक्ती, वजुद, सुहाग रात यासारख्या बॉलिवूड चित्रपटात देखील त्यांनी काम केले. पुण्यातील सकाळ वृत्तपत्रासाठी असिस्टंट एडिटर म्हणूनही त्यांनी काम सांभाळले होते.

मोहन गोखले यांच्या पत्नी शुभांगी गोखले. शुभांगी गोखले यांनी मोहन गोखले सोबत मिस्टर योगी मालिकेत एकत्रित काम केले होते. आताच्या साखर खाल्लेला माणूस या नाटकालाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. शुभांगी गोखले या पूर्वाश्रमीच्या ‘शुभांगी संगवी’ त्यांचा खामगाव येथे जन्म झाला. त्यांचे वडील हे त्याकाळचे नामवंत वकील तर आई गृहिणी. लापतागंज, श्रीयुत गंगाधर टिपरे, बोक्या सातबंडे, काहे दिया परदेस, चिडीया घर, कोशिश अशा हिंदी मराठी मालिकेतून त्यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली.

मोहन आणि शुभांगी गोखले यांची सखी ही एकुलती एक कन्या. मोहन गोखले यांचे निधन झाले त्यावेळी सखी अवघ्या सहा ते सात वर्षांची होती, त्यामुळे वडिलांच्या आठवणी तीने अजूनही आपल्या आठवणींच्या कोपऱ्यात कुठेतरी जपून ठेवल्या असतील. ११ एप्रिल २०१९ रोजी सखी गोखले अभिनेता सुव्रत जोशी सोबत विवाहबंधनात अडकली. अभिनेता सुव्रत जोशी आणि सखी गोखले यांनी टीव्ही मालिका तसेच नाटकांमध्येही एकत्र कामे केली आहेत हा त्यांचा प्रेम विवाह आहे. गोखले कुटुंबातील ह्या दिग्गज कलाकरांना आमच्याकडून मानाचा मुजरा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *