बोक्या सातबंडे, श्रीयुत गंगाधर टिपरे, चूक भूल द्यावी.. या ना अशा अनेक मालिकांमधून दिलीप प्रभावळकर यांनी आपल्या सजग अभिनयाची झलक दाखवून दिली. एवढेच कशाला लगे रहो मुन्नाभाई मधील गांधीजी, झपाटलेला मधील त्यांनी साकारलेला तात्याविंचू आजही रसिक प्रेक्षक विसरू शकत नाहीत. हात अजरामर भूमिका तर त्यांच्या वाट्याला आल्याच परंतु रंगभूमीवरही त्यांनी वासूची सासू मधून स्री पात्र अगदी सुरेख बजावले.

रामरुईआ कॉलेज मधून केमिस्ट्री विषयातून त्यांनी पदवी मिळवली. तर भाभा आटोमिक रिसर्च सेंटर मधून मास्टर्सची डिगरी मिळवली. यानंतर दिलीप प्रभावळकर यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि मागे वळून न पाहता आज तागायत अनेक अजरामर अभिनय साकारून प्रेक्षकांची मने जिंकली. दिलीप प्रभावळकर यांच्या पत्नीचे नाव नीला. नीला प्रभावळकर ह्या हाऊस वाइफ आहेत. त्यांना केदार प्रभावळकर हा एकुलता एक मुलगा. पण केदार प्रभावळकर याना अभिनयाची मुळीच आवड नाही त्यामुळे ते अभिनयापासून थोडे दूरच राहिलेले पाहायला मिळतात.

१७ डिसेंबर २०१३ रोजी केदारने सोनल अलवारससोबत मोठ्या थाटात लग्न केले. या लग्नाला अतुल परचुरेसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. केदार प्रभावळकर यांची पत्नी सोनल ही ख्रिश्चन असून महाराष्ट्रीयन पद्धतीने त्यांनी आपले लग्न केले. सोनल आणि केदार दोघेही इन्व्हायर्नमेंटल मॅनेजमेंट सेंटरशी निगडित आहेत. हे पर्यावरण प्रेमी दुर्गम भागात जाऊन जनजागृती घडवून आणण्यास प्रोत्साहन देतात. दिलीप प्रभाळकर यांचे हे संपूर्ण कुटुंब पुण्यात स्थायिक आहे परंतु कामानिमित्त दिलीप प्रभाळकर याना मुंबईला राहावे लागते आधींमधून ते पुण्याला त्यांच्या राहत्याघरी सुट्टीचा आनंद घेताना पाहायला मिळतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *