दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे चित्रपटातील “चुटकी” आता दिसते अशी…पाहून आश्चर्य वाटेल

दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हा चित्रपट १९९५ साली प्रदर्शित झाला होता. शाहरुख खान, काजोल, अमरीश पुरी यासारखी बडी स्टार कास्ट असलेला हा चित्रपट यशस्वी चित्रपटाच्या यादीत जमा झाला होता. चित्रपटातील सर्वच गाणी रसिकांच्या विशेष पसंतीस देखील उतरलेली पाहायला मिळाली. याच चित्रपटात काजोलची बहीण म्हणजेच “चुटकी” तिच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या आजही स्मरणात असावी. या चुटकीची भूमिका साकारली होती “पूजा रुपारेल” या अभिनेत्रीने.

२१ नोव्हेंबर १९८२ रोजी मुंबईत पूजा रुपारेल हीचा जन्म झाला. पूजाने दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हा चित्रपट साकारण्याआधी १९९३ सालच्या ” किंग अंकल” चित्रपटात बालकलाकाराची भूमिका बजावली होती. ज्यात शाहरुख खान आणि जॅकी श्रॉफ प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाले. परंतु दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मधील चुटकीच्या भूमिकेमुळे तिला विशेष ओळख मिळाली.
त्यानंतर तिने छोट्या पडद्यावरील २४ ही सिरीज , जबान संभालके, बा बहू और बेबी ह्या मालिका साकारल्या. पूजा रुपारेल ही सोनाक्षी सिन्हा ची बहीण असल्याचे बोलले जाते. पूजा आता वेगवेगळ्या शोद्वारे स्टँडप कॉमेडी द्वारे प्रेक्षकांसमोर येत आहे शिवाय ती एक उत्कृष्ट गायिका देखील आहे. तिने इंडस्ट्रीयल सायकॉलॉजी विषयातून मास्टरची डिग्री प्राप्त केली आहे. पूजाने दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे चित्रपटही भूमिका आजही प्रेक्षकांच्या तितकीच लक्षात आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *