दिनेश कार्तिक यांना मित्रानेच दिलेला धोका, पहिल्या पत्नीशी डिवोर्स घेऊन केला ह्या सुंदरीशी विवाह

दिनेश कार्तिक आणि पत्नी दीपिका पल्लीकल (इंटरनेश्नल स्क्वैश प्लेयर) यांचे फोटो सध्या सोशिअल मीडियावर चांगलेच व्हायरल होताहेत. परंतु दिनेश कार्तिक यांचे पूर्वेचे जीवन खूप खडतर राहिलेय. दिनेश कार्तिक यांची पहिली पत्नी निकिता हीच आणि दिनेशच २००७ साली लग्न झालत. पण ipl च्या ५ व्या मोसमात दिनेश कार्तिक यांची पत्नी आणि चेन्नईचा क्रिकेटर मुरली विजय यांची ओळख झाली.

निकिता आणि मुरली विजय दोघे एकमेकांना आवडू लागले. दोघेही एकमेकांना वेळ देऊ लागले. जेव्हा हि गोष्ट दिनेशला समजली तेंव्हा त्यांनी निकिताला डिवोर्स दिला. काही महिन्यातच निकिता आणि मुरली विजय या दोघांनी लग्न केलं. डिवोर्स वेळी निकिता प्रेग्नन्ट होती. त्यानंतर दिनेश कार्तिक भारतीय टीम पासून खूप दूर राहू लागला.

२०१३ साली दिनेश कार्तिक यांची ओळख इंटरनेश्नल स्क्वैश प्लेयर दीपिका पल्लीकल हिच्याशी झाली. दिनेशच्या खराब काळात दीपिकाने दिनेशला खूप सपोर्ट केला.

जवळपास दोन वर्षानंतर त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी २०१५ साली लग्न केलं. दीपिका पल्लीकल ह्या क्रिश्चियन असल्यामुळे 18 ऑगस्ट २०१५ साली दोघांनी क्रिश्चियन रीतिरिवाजने तर २० ऑगस्ट २०१५ ला म्हणजेच २ दिवसांनी त्यांनी हिंदू रीति-रिवाजा नुसार लग्न केलं.

दीपिकाने ग्लासगो मध्ये खेळताना (२० व्या कॉमनवेल्थ २०१४ साली) भारतासाठी गोल्ड मेडल जिंकलं होत. दीपिका पल्लीकल आणि दिनेश कार्तिक यांचा साखरपुडा १५ नोव्हेंबर २०१३ साली झालेला असं आज-तक ह्या हिंदी चॅनेलने सांगितले आहे.

दीपिका पल्लीकल यांची आई सुसान पल्लीकल ह्याही एक क्रिकेट खेळाडू होत्या. दीपिका पल्लीकल सध्या एक ट्रेवल एंजेसी मध्ये संचालिकेचं काम पाहतात.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *