“दादा मी प्रेग्नन्ट आहे” पुण्यातील होर्डिंग्ज चे सत्य आले समोर….हि सुंदर अभिनेत्री आहे प्रेग्नन्ट

काही महिन्यांपूर्वी पुण्यात “शिवडे मला माफ कर” अशा होर्डिंग्जनि सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता नुकत्याच काही दिवसांपूर्वी च्या “दादा मी प्रेग्नन्ट आहे ” अश्या स्वरूपाचे होर्डिंग्ज पुण्यात आणि मुंबईत पाहायला मिळाले. या होर्डिंग्ज वरून अनेकांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाला. अनेक तर्कवितर्क लावत याचा संबंध मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी यांच्या नव्या येऊ घातलेल्या चित्रपट ” पुणे मुंबई 3 ” सोबत जोडण्यात आला होता.

परंतु नुकताच या होर्डिंग्ज वरील पडदा उलगडला आहे . हा कोणत्याही चित्रपटाच्या प्रमोशनच्या भाग नसून उमेश कामत, हृता दुर्गुले यांच्या ” दादा एक गुड न्यूज आहे” या नाटकाच्या प्रमोशनचा आहे. यात फुलपाखरू फेम हृता दुर्गुळे उमेश कामत याच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच या नाटकाचे पोस्टर लॉन्च झाले असल्याने ही बाब समोर आली आहे. त्यामुळे तूर्तास ‘शिवडे’ प्रकरणासारखेच “दादा मी प्रेग्नन्ट आहे” या होर्डिंग्ज चा उलगडा झाला आहे. काही दिवसांपूर्वी उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी “गोड बातमी” देणार असल्याचे सांगितले होते. मग ही गोड बातमी याच नाटकाचा एक भाग असल्याचे आता समोर आले आहे. लवकरच हे नाटक देखील रंगभूमीवर प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे. नाटकाचे दिग्दर्शन माझ्या नवऱ्याची बायको मधील सौमित्र म्हणजेच अद्वैत दादरकर याचे असून, निर्मिती स्वतः उमेश कामत ची पत्नी प्रिया बापट हिने केलेली आहे.
अश्या प्रकारे लोकांची उत्सुकता वाढवून नाटक गोच्यात ही येऊ शकते.. पण त्यामुळे नाटकाचा टीआरपी वाढेल म्हणूनच अश्या प्रकारचं पाऊल उचलण्यात आल्याचं समोर आलंय.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *