“दबंग ३” मध्ये सलमान खान आपल्या भाचीला करणार लॉन्च…पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा

सलमान खान त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी असल्याचे दिसत आहे. कतरीना कैफ, सलमान खान यांची प्रमुख भूमिका असलेला “भारत” हा चित्रपट ५ जूनला प्रदर्शित होणार आहे. परंतु सलमान आपला आगामी चित्रपट “दबंग ३” च्या प्रोजेक्टच्या तयारीला लागला आहे. प्रभू देवा या चित्रपटाच्या दिगदर्शकाची धुरा सांभाळत आहे तर अरबाज खान या चित्रपटाचा प्रोड्युसर आहे. २०२० साली ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जाते.

आजवर सलमानने अनेक कलाकारांना बॉलिवूडमध्ये काम मिळवून दिले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तो आपली भाची “अलिझेह अग्निहोत्री” हिला लॉन्च करणार असल्याचे समोर येत आहे. सलमानची बहीण अलविरा आणि अतुल अग्निहोत्री यांची ती मुलगी आहे. अतुल अग्निहोत्री हा बॉलिवूड अभिनेता तसेच दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. दबंग ३ चित्रपटाच्या माध्यमातून तो आपली भाची अलिझेह हिला लॉन्च करणार असल्याचे समजते. अलिझेह हिला ह्या चित्रपटात नेमकी कोणती भूमिका मिळणार हे अजून स्पष्ट झाले नाही.
असे असले तरी या चित्रपटाच्या निमित्ताने सलमानची भाची आता प्रकाशझोतात आली आहे. त्यामुळे तिचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *