actress bhagat actor

काही दिवसांपूर्वीच मराठी अभिनेत्री “अंकिता भगत” हिने मोठ्या थाटात साखरपुडा केला असल्याचे सांगितले आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच १० ऑगस्ट रोजी तीने आपला मित्र गौरव खानकर सोबत हा साखरपुडा केला आहे. साखरपुड्याचा आपला एक व्हिडिओ शेअर करत तिने ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या आनंदाच्या क्षणी अंकिता लाल रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. अंकिता ही मराठी मालिका अभिनेत्री तसेच एक उत्कृष्ट नृत्यांगना म्हणूनही ओळखली जाते.

ankita bhagat actress
ankita bhagat actress

स्टार प्रवाह या वाहिनीवरील “विठू माऊली” या लोकप्रिय मालिकेत अंकिताने जानकीची भूमिका बजावली होती. “अरण्यक” या नाटकाचाही ती एक भाग बनली होती. याशिवाय ‘युवा डान्सिंग क्वीन ‘ या शोमध्येही तीने पार्टीसिपेट केले होते. त्यात टॉप 6 च्या यादीत तीने आपले स्थान निर्माण केले होते. विविध प्रकारची नृत्यशैली सादर करून तीने प्रेक्षकांची दाद मिळवली होती. अंकिता प्रोफेशनल डान्सर असून अनेक म्युजिक व्हिडिओतून देखील ती झळकलेली पाहायला मिळाली. नृत्यात विशेष पारंगत असलेल्या अंकिताला वरसोली कोळीवड्याची शान अशीही एक नव्याने ओळख तीला मिळाली आहे. तीने साकारलेला कोळी गीतावरील “मी डोलकर” हा म्युजिक व्हिडीओ खूपच गाजला होता शिवाय “गणपती अधिपती”, ” व्हाट्स ऍप गर्ल” हे म्युजिक व्हिडीओ देखील तीने साकारले आहेत. याव्यतिरिक्त काही इव्हेंटमध्येही आपल्या नृत्याची झलक तीने दाखवुन दिली आहे. अंकिता भगत आणि गौरव खानकर यांना आयुष्याच्या या नव्या वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *