तसे पाहिले तर महेश कोठारेचे सर्वच चित्रपट सुपरडुपर हिटच ठरले आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे “थरथराट”, या चित्रपटात राहुल सोलापूरकर ‘टकलू हैवान’ या खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. त्याने साकारलेला डॉ बाबासाहेब आंबेडकर , राजर्षी शाहू महाराज आजही प्रेक्षकांच्या तितक्याच स्मरणात राहिला आहे. १७ ऑक्टोबर१९६३ साली राहुल सोलापूरकर यांचा जन्म झाला. पुण्यातील नूतन मराठी विद्यालयातून त्यांनी शालेय शिक्षण तर एसपी कॉलेज मधून पुढील शिक्षण घेतले आहे.

सासरचा पंगा सवतीचा इंगा, धुमाकूळ, बंडलबाज, अफलातून, थरथराट यासारख्या दमदार चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, महेश कोठारे या कलाकारांसोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. २ डिसेंबर १९८८ साली राहुल सोलापूरकर यांनी मृणाल सोबत लग्न केले. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा देवशिष ने डॉ डी वाय पाटील मधून डेंटिस्ट ची पदवी प्राप्त केली आहे. तर मुलगी इशिता पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये आपले शिक्षण पूर्ण करत आहे. अभिनय, राजकारण यासोबतच राहुल सोलापूरकर समाजकार्यात देखील सक्रिय असलेले पाहायला मिळतात. नुकतेच त्यांनी पुण्यातील, पिंपरी चिंचवड येथील कातकरी समाजातील शिक्षणापासून वंचित मुलींसाठी मदतीचे कार्य हाती घेतले आहे.”कातकरी समाजासाठी दीपस्तंभ ” या कातकरी कन्या शिक्षण सहाय्य योजनेतून मागास आणि आदिवासी जमातीतील मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले आहे.

या भूमिहीन, बेघर लोकांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य या सर्वच सुविधांपासून वंचित राहावे लागते हीच बाब लक्षात घेऊन चिंबळी फाटा चाकण परिसरातील काही कातकरी समाजाच्या मुलींना निगडी प्राधिकरण येथील डॉ जोगळेकर यांच्या निवासस्थानी कातकरी कन्या छात्रावास म्हणून राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या मुलींना ज्ञानप्रबोधिनी या नामांकित शाळेतदेखील प्रवेश देण्यात आला आहे. त्यांच्या या “कन्या शिक्षण साहाय्य योजनेत ” राहुल सोलापुरकर यांनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. या कार्यात आणखीन मदत मिळावी म्हणून ते त्यांच्या सहकलाकारांना आवाहन करताना दिसतात. त्यांच्या या कार्याला निश्चित असे यश मिळो एवढीच सदिच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *