त्रिदेव हा चित्रपट १९८९ साली प्रदर्शित झाला होता. तिरछि टोपी वाले…गाण्यामुळे ओए ओए गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनम प्रकाशझोतात आली होती. सोनम हे तिचे चित्रपटातले नाव याच नावाने ती पुढे ओळखली जाऊ लागली. तीचे खरे नाव आहे बख्तावर खान. बॉलिवूड अभिनेता रझा मुराद यांची ती भाची असल्याचे सांगितले जाते. विजेता हा तिने साकारलेला पहिला बॉलिवूड चित्रपट. आखिरी अदालत, मिट्टी और सोना, अजूबा, चोर पे मोर, इंसानियत असे आणखी काही चित्रपट तिने साकारले होते.

त्रिदेव चित्रपटावेळी सोनमचे तिच्यातून १७ वर्षाने मोठ्या असलेल्या दिग्दर्शक राजीव रॉयसोबत प्रेम जुळून आले आणि दोन वर्षांनी दोघांनी लग्नही केले. मधल्या काळात सोनमने चित्रपटातून काढता पाय घेतला. त्यानंतर तिला एक मुलगाही झाला. घर संसार अगदी सुरळीत सुरू असतानाच काही वर्षातच दोघांनी शुल्लक कारणामुळे वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. १५ वर्षे वेगळे राहिल्यानंतर २०१६ साली या दोघांनी कायदेशीर घटस्फोट घेतला. त्यानंतर २०१७ साली सोनम ने पेशाने डॉक्टर असलेल्या मुरली पोडुवलसोबत दुसरे लग्न केले. या बातमीमुळे विस्मृतीत गेलेली ओए ओए गर्ल सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागली. इतकी सुंदर अभिनेत्री आणि तेही उत्तम अभिनय करूनही तिला बॉलीवूड मधून काढता पाया घ्यावा लागला ह्याची खंत ती आजही व्यक्त करते. असो सोनमला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *