“त्या दिवशी बाळासाहेबांनी मला वाचवले नसते तर”… अमिताभ बच्चन यांनी सांगितली आठवण

हिंदि मराठी सिने सृष्टीतील दिग्गज आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यातील घनिष्ठ नात्याची चर्चा सगळीकडे ऐकायला मिळते.मराठीतील दिग्गज दादा कोंडके यांच्या चित्रपटाला जेव्हा चित्रपटगृह मिळत नव्हते त्यावेळी देखील खुद्द बाळासाहेबांनी पुढाकार घेत मराठी चित्रपट सृष्टीला पुढे आणण्यास मदत केली होती. तेव्हापासून दादा कोंडके आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातील मैत्रीच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ” ठाकरे ” हा मराठी चित्रपट २०१९ साली प्रेक्षकांसमोर येत आहे. यानिमित्ताने अमिताभ बच्चन यांनी देखील बाळासाहेबांची गोड आठवण सांगितली आहे.

१९८२ साली ‘कुली’ चित्रपटाचे चित्रीकरण चालू असतानाच एका सिन दरम्यान अमिताभ यांना गंभीर दुखापत झाली होती. यादुखापतीमुळे ते काही दिवस बेशुद्ध देखील झाले होते. बंगलोर वरून विमानातून त्यांना मुंबईकडे रवाना करण्यात आले होते. यावेळी मुसळधार पाऊस असल्याने कुठल्याही अम्ब्युलन्सची सुविधा त्यांना मिळाली नाही. परिस्थिती आणखीनच गंभीर होत असतानाच बाळासाहेबांनी शिवसेनेची अम्ब्युलन्स त्यांच्या मदतीसाठी रवाना केली. ‘ही मदत त्यावेळी मला मिळाली नसती तर… ‘ असे उद्गार काढत बाळासाहेब मला माझ्या वाडीलांसारखे असल्याचे त्यांनी सांगितले. अमिताभ बच्चन यांचे लग्न झाले त्यावेळी देखील बाळासाहेबांनी मातोश्रीवर जया आणि अमिताभ बच्चन यांना आमंत्रित करून अगदी आपल्या सुनेप्रमाणेच तिचे स्वागत केले होते.
आशा अनेक गोड आठवणी काढत बाळासाहेब यांच्यावर केवळ एकच चित्रपट न बनवता अनेक वेबसिरीज बनवल्या जाव्यात, असे मत अमिताभ बच्चन यांनी सांगितले

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *