तुला पाहते रे मालिकेत “निळुफुले” यांची मुलगी तर “विजय गोखले” यांचा मुलगाही काम करतो.. पहा कोण आहे त्यांचा मुलगा पाहण्यासाठी

तुला पाहते रे ह्या आगळ्यावेगळ्या प्रेमकथेवर सुरवातीला सोशिअल मीडियावर प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिकार दर्शवला, पण जसजशी मालिका पुढे जात गेली तसतसा प्रेक्षकांनीही पाहण्याचा दृष्टिकोन बदलत मालिका डोक्यावर घेतली. मालिकेच वैशिष्ट्य म्हणजे ह्या मालिकेतील सर्वच पात्रे खूप चांगल्या प्रकारे अभिनय करतात. तुम्हाला हे माहीतच असेल कि निळुफुले यांची कन्या ह्या मालिकेतील अभिनेत्री गायत्री दातार हिच्या आईची भूमिका साकारतेय. असेच आणखीन एक पात्र ह्या मालिकेत आहे जे प्रसिद्ध अभिनेते “विजय गोखले” यांचा मुलगा आहे.

विजय गोखले यांनी दूरदर्शनवरील ” श्रीमान श्रीमती ” ही हिंदी विनोदी मालिका गाजवली होती. या मालिकेतील भूमिकेमुळे ते घराघरात जाऊन पोहोचले. सालीने केला घोटाळा, ही पोरगी कोणाची, पोलिसाची बायको यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. दम असेल तर, भरत आला परत यांचेअभिनेता आणि दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. ‘दम असेल तर’ मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा आशुतोष याला देखील अभिनयाची संधी दिली होती. तुला पाहते रे मालिकेत सरंजामे परिवारातील जयदीप सरंजामे ह्यांची व्यक्तिरेखा साकारणारा अवली कलाकार “आशुतोष गोखले” हा विजय गोखले यांचा मुलगा आहे. आशुतोष गोखले यांचा जन्म २७ मे १९९१ साली मुंबई येथे झाला. रुपारेल कॉलेजमधून त्याने आपले शिक्षण घेतले आहे.


त्यावेळी अनेक एकांकिकामध्ये त्याने उत्स्फूर्त सहभाग दर्शवला होता. संगीत कोणे एके काळी, बत्ताशी, सवाई यासारख्या एकांकिकेचे सादरीकरण केले. त्यापैकी बत्ताशी या एकांकिकेला उत्कृष्ट एकांकिकेचे पारितोषिकही मिळाले. भाऊचा धक्का, युनो यासारख्या शॉर्ट फिल्मचाही तो एक भाग बनला. ओ वुमनिया, डोन्ट वरी बी हॅपी आणि भारत जाधवसोबत मोरूची मावशी ही नाटकेही त्याने रंगमंचावर गाजवली. अगदी सहज साधा अभिनय म्हणून त्याची ख्याती आहे. रक्तातच अभिनय असल्याचं बरेच जण सांगतात. रंगमंच असो व एखादी मालिका सगळ्यांत अगदी सहजपणे रुळणारे आशुतोष गोखले सर्वानाच हवेहवेसे वाटतात. मनमिळाऊ आणि खोडकर स्वभाव हि त्यांची जमेची बाजूच म्हणावी लागेल. आशुतोष गोखले हे अजूनही अविवाहित आहेत.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *