तुला पाहते रे मालिकेतील विक्रांतच्या ऑफिसमधली “सपना” रिअल लाईफ मध्ये आहे खूपच स्टायलिश आणि बोल्ड

झी वाहिनीच्या “तुला पाहते रे ” मालिकेत विक्रांत ईशा हीच राजनंदिनी असल्याचे दाखवण्याच्या प्रयत्नात आहे. अनावधानाने का होईना पण तिचा हा पलटवार विक्रांतची खेळी डावलण्यात यशस्वी होताना दिसत आहे. त्यामुळे मालिकेत खऱ्या राजनंदिनीची एन्ट्री कधी होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. तूर्तास मालिकेतील विक्रांतच्या ऑफिसमध्ये “सपना” हे पात्र नेहमीच ईशाच्या बाजूने असलेलं दर्शवण्यात आलं. ईशाच्या चांगल्या वाईट प्रसंगी सपना तिच्या बाजूने असलेली पाहायला मिळाली. ह्या सपना ची भूमिका साकारली आहे अभिनेत्री “सोनाली खटावकर” हिने. तिच्याबद्दल आणखीन जाणून घेउयात…

अभिनेत्री सोनाली खटावकर हिने मुंबईतील एसएनडीटी कॉलेजमधून बीकॉम ची पदवी प्राप्त केली. डिप्लोमा इन ह्यूमन रिसर्च मध्ये देखील तिने पदवी मिळवली . ह्यासोबतच तिने नोकरी करताकरता ऑपरेशन मॅनेजमेंट विषयातून MBA ची पदवी प्राप्त केली. एका मल्टिनॅशनल कंपनीत तिने अडमिन कम फॅसिलिटी मॅनेजर पदावर काम केले. परंतु अभिनयाची आवड असल्याने दोन वर्षांपूर्वी तिने ही नोकरी सोडून संपुर्ण वेळ अभिनयासाठी देण्याचे ठरवले. अनेक छोट्या मोठ्या नाटकात तिने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. “तुला पाहते रे” ही तिने साकारलेली पहिलीच मालिका आहे. मालिकेतील तिचे सपना चे पात्र छोटे जरी वाटत असले तरी तीची ही भूमिका स्मरणात राहते. सोनालीला अभिनयातच आपले करिअर घडवून आणायचे आहे त्यामुळे चांगल्या पदाच्या नोकरीला तिने रामराम ठोकला आहे. तिचा अभिनय पाहता पुढे ती चित्रपटात, मालिकेत निश्चितच अपेक्षित यश गाठेल यात शंका नाही.
सोनाली खटावकर हिला तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!!

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *