तुला पाहते रे मालिकेतील ईशाची “पिंकी मावशी” करतीये हे काम… फोटो पाहून आश्चर्य वाटेल

तुला पाहते रे मालिकेत विक्रांत आणि ईशाच्या लग्नात पिंकी मावशीने हजेरी लावली होती. मालिकेतील पिंकी मावशीचे पात्र ईशाच्या लग्नात चांगलीच धमाल उडवून देताना दिसले. सुरुवातीला हे पात्र विक्रांत आणि ईशाच्या लग्नात काहीतरी गोंधळ किंवा विघ्न आणते की काय अशी पुसटशी शंका प्रेक्षकांच्या मनात होती पण हा एक ट्विस्ट प्रेक्षकांनी आपलासा केल्याने मालिकेत पिंकीचे पात्र आणखीनच खुलत गेले. मालिकेत सरंजामे कुटुंबीयांच्या थाटाला भुरळून गेलेली हि पिंकी मावशी साकारली होती “सुरभि भावे” या अभिनेत्रीने.

सुरभी भावे या अभिनेत्रीला तुम्ही बऱ्याच मालिकेत महत्वाच्या भूमिका साकारताना पाहिले असेल. तिच्याबद्दल अधिक जाणून घेऊयात… सुरभी हीने मुंबई युनिव्हर्सिटी मधून मास मीडियाची पदवी मिळवली आहे. शिक्षणानंतर तिने रंगभूमीवरील अनेक नाटकात विविध धाटणीच्या भूमिका बजावल्या. स्टार प्रवाहवरील “गोठ” मालिकेत तिने दीप्ती साकारली, कलर्स मराठीवरील “सख्या रे” मध्ये तिने प्राची साकारली. विशेष म्हणजे स्टार प्रवाहवरील “ग सहाजनी” मधील तिची भूमिका लक्षवेधी ठरली. अभिनयासोबतच सुरभिला आर्टिफिशल ज्वेलरी बनवण्याची आवड आहे. तिने डिझाईन केलेल्या बऱ्याच ज्वेलरीचे कलेक्शन तिच्या फेसबुक पेजवर तुम्हाला पाहायला मिळतील. विशेष म्हणजे तिच्या या आकर्षक ज्वेलरी डिझाईन्सला अनेक सेलिब्रिटिकडून उत्तम प्रतिसाद देखील मिळत आहे. तिचे हे कौशल्य महिला वर्गाला निश्चितच भुरळ घातल्याशिवाय राहणार नाही.
सुरभी भावे हिने साकारलेली “पिंकी मावशी” रसिकजनांच्या कायम स्मरणात राहील यात शंका नाही. तीला अशाच उत्तमोत्तम भूमिका मिळत राहो हीच सदिच्छा!!!…

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *