“तुला पाहते रे” मालिकेतील ईशाची मैत्रीण ‘रुपाली’ बद्दल जाणून घेतल्यावर तुम्ही नक्कीच wow म्हणाल.

झी मराठीवरील “तुला पाहते रे” मालिकेत वेगवेगळ्या घडामोडी घडून येताना दिसत आहेत. मालिकेत “जालिंदरची” एन्ट्री झाल्याने विक्रांत आणि ईशा यांच्यातील नात्यात तो दुरावा निर्माण करताना दिसत आहे. तसेच विक्रांतच्या पूर्वायुष्यातील घटना उलगडणार का हेही आता लवकरच उघड होणार आहे. यासर्वांमध्ये ईशाची मैत्रीण “रुपाली ” तिला कशी साथ देते हे दर्शवण्यात येत आहे. या रूपालिबद्दल आणखीन जाणून घेऊयात…. मालिकेमध्ये रुपालीचे पात्र अभिनेत्री “सोनल पवार” हिने साकारले आहे. याआधीही सोनल पवार तुम्हाला अनेक टीव्ही मालिकेत झळकताना दिसली असेल. रुपलीचा जन्म १ डिसेंम्बर रोजी झाला असून सातारा कॉलेज ऑफ फार्मसि मधून तिने बी फार्म ची पदवी प्राप्त केली आहे.

यासोबतच ती एक उत्कृष्ट नृत्यांगना देखील आहे. कॉलेजमध्ये असतानाच रूपालिला एका नाटकात काम करण्याची संधी मिळाली आणि येथूनच अभिनयाची आवड निर्माण झाली. युथ फेस्ट आणि एकांकिका स्पर्धा साकारत अभिनयाकडे वाटचाल सुरू झाली. कॉलेज संपून मुंबईत आल्यावर तिने हॉस्पिटल फार्मसिटीत काम पाहिले. परंतु अभिनयाची आवड असल्याने या क्षेत्रात मन रमेना म्हणून कलाक्षेत्र आणि करियर यातील एकाचीच निवड करण्याचे ठरवले. मग साहजिकच ज्या क्षेत्रात आपले मन रमेल अशा क्षेत्राची निवड केली .
काही ब्रँड साठी मॉडेलिंग करत असतानाच झी वाहिनीच्याच “अस्मिता” या मालिकेत छोटीशी भूमिका साकारण्याची संधी तिला मिळाली. “चाहूल ” आणि” सरस्वती ” या मालिका देखील तिने अभिनित केल्या. नुकताच शशांक केतकरचा प्रदर्शित झालेला चित्रपट “३१ दिवस” या चित्रपटाचाही ती एक भाग बनली. याखेरीज ती “मनातल्या आभाळात प्रेमाचं चांदणं” या गण्यातही झळकली.परंतु “सरस्वती” मालिकेतील तिने साकारलेली “वंदना” विशेष लक्षवेधी ठरली आणि झी वाहिनीच्याच “तुला पाहते रे” मालिकेत तिची वर्णी लागली. ईशाला वेळोवेळी मदत करणारे “रुपालीचे” पात्र तिने अगदी चोख बजावलेले पाहायला मिळत आहे. अभिनेत्री सोनल पवार हिला तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!…

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *