तुला पाहते रे मालिकेच्या जागी येणार “ही” नवी मालिका…नेटकाऱ्यांनी लावले आश्चर्यकारक तर्क

झी मराठी या वहिनीने आजवर अनेक धाटणीच्या मालिका प्रक्षेपित करून प्रेक्षकांचे मनोरंजन केलेले पाहायला मिळते. गेली कित्येक वर्षे चला हवा येऊ द्या ने तर प्रेक्षकांना मनमुराद हसवले आहे. त्यामुळेच झी वाहिनीचा प्रेक्षकवर्गात मोठ्या संख्येने वाढ होताना दिसते. त्यात अनेक नवख्या कलाकारांना झी वहिनीने नेहमीच उत्तम संधी मिळवून देत त्यांना प्रसिद्धीच्या झोतात आणले आहे. झी वाहिनी वरील तुला पाहते रे ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे समोर येत आहे. येत्या काही भागातच मालिकेचे कथानक रेंगाळत बसण्यापेक्षा आटोपते घेण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे ८.३० वाजता प्रक्षेपित होत असलेल्या ह्या मालिकेच्या जागी आता नव्या मालिकेची वर्णी लागणार आहे.

“मिसेस मुख्यमंत्री ” ह्या नावाने ही नवी मालिका झी वाहिनीवर प्रसारित होत आहे. येत्या काही दिवसातच या मालिकेत कोणकोणते कलाकार झळकणार हे स्पष्ट होईल. तूर्तास त्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार . मालिकेच्या प्रोमोवरून तर ही मालिका विनोदी धाटणीची वाटत आहे. परंतु “मिसेस मुख्यमंत्री ” नावाने सुरू होणाऱ्या मालिकेचे कथानक नेमके कसे असेल ? यावर सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत.
सोशल मीडियावर नेटकाऱ्यांनी ह्या नव्या मालिकेचे स्वागतच केलेले पाहायला मिळत आहे. उगाचच मालिका रेंगाळत ठेवण्यापेक्षा तुला पाहते रे मालिकेच्या दिग्दर्शकाने मालिका संपवण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे “मिसेस मुख्यमंत्री” या नव्या मालिकेत प्रमुख भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी “अमृता फडणवीस” तर नाही ना साकारणार ? असे मजेशीर तर्क लावले आहेत.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *