तुला पाहते रे मालिकेच्या जागी येणार “ही” नवी मालिका…प्रोमो पाहून नेटकरी झाले खुश

झी मराठीवरील तुला पाहते रे ही मालिका लवकरच प्रेक्षकांनाचा निरोप घेणार आहे. नुकतेच या मालिकेच्या शेवटच्या भागाची आठवण म्हणून त्यातील कलाकारांनी फोटो शेअर केले होते. मालिका निरोप घेते म्हटल्यावर या मालिकेची जागा आता नवी मालिका घेणार हे निच्छित. नुकताच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि अल्पावधीतच ह्या प्रोमोला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे त्याला कारणही तसेच आहे. ह्या नव्या मालिकेचे नाव आहे “अग्गबाई सासूबाई”.

मालिकेत अनेक प्रसिद्ध कलाकार झळकणार असल्याने झी च्या चाहत्यांनी या प्रोमोचे स्वागत केले आहे. तेजश्री प्रधान पुन्हा एकदा मालिकेकडे वळल्याने तिच्या मालिकेला प्रचंड प्रतिसाद मिळणार जे नक्की. तेजश्री सूनबाईच्या भूमिकेत दिसणार आहे तर सासूच्या भूमिकेत निवेदिता सराफ झळकणार आहेत. मालिकेच्या प्रोमोवरून ‘सासूचे लग्न’ अशा संदर्भातील आगळेवेगळे कथानक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही मालिका नेमकी कशी आहे ते येत्या काही भागात स्पष्ट होईल पण त्यासाठी थोडी वाट पहावी लागेल. हे प्रसिद्ध कलाकार प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार म्हणून नेटकरी देखील खूप खुश झाले आहेत. झी वाहिनीच्या ह्या निर्णयाला आता किती यश मिळेल हे येणार कालच ठरवेल मात्र ह्या निर्यात सगळीकडून स्वागतच होताना पाहायला मिळतंय.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *