“तुला पाहते रे” च्या सेटवर ‘राजनंदिनी’ ची धमाकेदार एन्ट्री…प्रेक्षकांची आतुरता शिगेला

“तुला पाहते रे” या झी वाहिनीच्या मालिकेत सध्या ईशा थोडीशी भांबावलेली दिसत आहे. कारण ज्या माणसाने तिला प्रेम करायला शिकवले तोच माणूस स्वतःची ओळख तिच्यापासून लपवून ठेवतो. यामुळे तिला नक्कीच ईशाला मोठा धक्का बसला आहे. विक्रांत सरंजामे हेच गजा पाटील आहेत की काय? या द्विधा मनस्थितीत असल्यामुळे ईशाची घाबरगुंडी उडाली असल्याच मालिकेत दाखवण्यात आल्याने मालिका आता वेगळ्या वळणार येऊन ठेपली आहे. त्यामुळे मालिकेचा खरा चेहरा म्हणजेच “राजनंदिनी ” लवकरच मालिकेत दमदार एन्ट्री घेत आहे.

दोन दिवसांपूर्वीच मालिकेच्या सेटवर राजनंदिनीचे म्हणजेच अभिनेत्री “शिल्पा तुळसकर” हिने आपले शूटिंग सुरू केले आहेत. एका मुलाखतीत तिनेच हा खुलासा केला आहे त्यामुळे मालिकेच्या प्रेक्षकांना ज्या क्षणाची आतुरता होती तो क्षण लवकरच अनुभवायला मिळणार आहे.
सुबोध भावे आणि शिल्पा तुळसकर हे पहिल्यांदाच या मालिकेच्या निमित्ताने एकत्रित काम करत आहेत. शिल्पा तुळसकर या अनुभवाने माझ्यापेक्षा खूप मोठ्या असल्याचेही त्याने यावेळी म्हटले आहे. परंतु मी यात विरोधी भूमिका साकारतोय हा एक खेद त्याला वाटत आहे. होळीच्या दिवशी देखील शिल्पा आणि सुबोध इंस्टा लाईव्ह आले होते, तेव्हाच प्रेक्षकांना या क्षणाची आतुरता लागून राहिली होती. त्यांची ही आतुरता निश्चितच योग्य म्हणावी लागेल. कारण मालिकेचे कथानक आणि राजनंदिनीचे पूर्वायुष्य आता लवकरच उलगडणार आहे. खरं तर शिल्पा तुळसकर मालिकेत एन्ट्री घेणार म्हटल्यावर आता मालिकेचा घसरलेला टीआरपी निश्चितच वाढणार आहे.
मालिकेने २०० भाग पूर्ण केले आहेत. याआधी शिल्पा तुळसकरने मालिकेचे सुरुवातीचे भाग पाहिले होते. परंतु मुलाच्या परिक्षेखातर ही मालिका पुढे पाहण्याचे तिने टाळले. कारण ईशाच्या भूमिकेपेक्षा राजनंदिनीची भूमिका तिला स्वबळावर उभारायची आहे. त्यामुळे दोघींची तुलना इथे प्रकर्षाने टाळली जाईल, असे मत तिने यावेळी स्पष्ट केले. पुढच्या काही भागातच आपल्याला राजनंदिनी कोण आणि ती कशी होती? हे लवकरच पाहायला मिळणार आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *