rekha rao child actress

फोटो दिसणाऱ्या बालकलाकार अभिनेत्रीला तुम्ही कदाचित तिला ओळखलं नसेल चला तर तिच्याबद्दल जाणून घेऊयात.. लहानपणापासूनच ह्या अभिनेत्रीने बरीच मोठी मजल मारली होती आणि मोठी झाल्यावर अनेक मराठी सुपरहिट चित्रपट हि तिच्या नवे आहेत. मराठी चित्रपट सृष्टीत आजवर अनेक अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाच्या जोरावर कित्येक दशके अधिराज्य गाजवलेले पाहायला मिळते. यात वर्षा उसगावकर, जयश्री गडकर, आशा काळे, उमा भेंडे, किशोरी शहाणे, उषा चव्हाण, अश्विनी भावे यासोबतच अशी बरीच नावे घेता येण्यासारखी आहेत. ८० ते ९० च्या दशकात अभिनेत्री “रेखा राव “यांनी देखील मराठी सृष्टीतील दमदार चित्रपटातून उत्तमोत्तम भूमिका साकारून आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली होती.

rekha rao marathi actress pic
rekha rao marathi actress pic

केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूड आणि दाक्षिणात्य क्षेत्रात देखील त्यांनी आपल्या अभिनयाने वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका गाजवल्या. आज त्या मराठी सृष्टीतून गायब जरी झाल्या असल्या तरी त्यांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. रेखा राव या मूळच्या बंगलोरच्या. लहानपणापासूनच त्यांना नृत्याची विशेष आवड होती त्यासाठीचे प्रशिक्षण देखील त्यांनी घेतले होते अगदी राज कपूर यांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या नृत्याची अदाकारी दाखवून कौतुकाची थाप मारून घेतली होती. याच आवडीमुळे पुढे त्यांनी दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत पाऊल देखील टाकले. १९७९ साली ‘अथेगे थक्का सोसे’ या कन्नड चित्रपटातून रेखा राव यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकून शुभ मंगल सावधान , धरलं तर चावतय, प्रेम करूया खुल्लम खुल्ला, अनपेक्षित, ईना मीना डिका असे दमदार चित्रपट साकारले. यात बहूतेक चित्रपटात त्यांच्या सहकलाकाराची भूमिका अशोक सराफ यांनीच निभावलेली पाहायला मिळाली. त्यामुळे रेखा राव आणि अशोक सराफ यांचे एक छान समीकरण जुळून आलेले पाहायला मिळाले.

ashok and rekha rao
ashok and rekha rao

वर्षा उसगावकर, किशोरी शहाणे यांच्या पंक्तीत रेखा राव यांनी आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. हम दिल दे चुके सनम, तेहजीब यासारख्या बॉलिवूड चित्रपटात त्यांनी महत्वाच्या भूमिका देखील बजावल्या. यानंतर त्यांनी आपली पावले छोट्या पडद्याकडे वळवली. “सर्व मंगल मंगलाये”, “शुभ विवाह” या त्यांनी अभिनित केलेल्या कन्नड मालिका खूप गाजल्या. आता सध्या रेखा राव या बंगलोर येथेच स्थायिक झाल्या आहेत. मालिका आणि चित्रपटांपासून त्या थोड्या दूरच राहिलेल्या दिसतात अगदी एखादी भूमिका आवडलीच तरच त्या ती करतात. त्यांना फिरायची खूप आवड असल्याने फिरायची राहून गेलेली ठिकाणे त्या आवर्जून पाहायला जातात. मराठी सृष्टीत आज त्या दिसत नसल्या तरी रसिक मायबापांना हे विस्मृतीत गेलेले कलाकार विसरणे केवळ अशक्यच, नाही का.. त्यामुळे मित्रानो बालकरांना प्रोत्साहन द्या पिस्तकी दुनियेपेक्षाही वेगळं जग आहे कला खूप कमी जणांच्या वाटेल येते त्यांच्यापासून ती मुळीच दूर करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *