raja our rank balkalakar

चित्रात दिसतोय तो फोटो आहे ‘राजा और रंक’ ह्या प्रसिद्ध हिंदी चित्रपटाचा. १९६८ साली हा चित्रपट रिलीज झाला आणि सिनेमागृहात हा चित्रपट खूपच गाजला , त्याच कारणही अगदी तसंच होत राजाचा मुलगा युवराज आणि एका गरीब घरातील मुलगा ह्यांचे चेहरे दिसायला अगदी तंतोतंत असतात आणि ह्या दोन मुलांची मैत्री होते आणि ते एकमेकांचे कपडे परिधान करून एक गरीब आणि दुसरा आनंदाचे जीवन जगण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात. त्या चित्रपटातील त्या एकाच लहान मुलाने ह्या दोन्ही भूमिका खूपच उत्कृष्ठरित्या साकारलेल्या पाहायला मिळाल्या आणि पुढे त्याच मुलाने मराठी चित्रपटात धुमाकूळ घातला.

raja aur rank film
raja aur rank film

फोटोतील ह्या लहान मुलाला अनेकांनी कदाचित ओळखलं नसेल. बघा थोडं डोकं खाजवून बघा काही आठवतंय का? नाही.. मग राहूद्या आम्हीच सांगतो‘राजा और रंक’ ह्या प्रसिद्ध चित्रपटातील हा बालकलाकार दुसरा तिसरा कोणी नसून मराठीतील प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माता “महेश कोठारे” हेच आहेत. महेश कोठारे ह्यांचं सर्व श्रेय ते नेहमीच त्यांच्या वडिलांना म्हणजेच अंबर कोठारे ह्यांना देतात. अंबर कोठारे हेदेखील एक प्रसिद्ध अभिनेते आहेत आणि महेश कोठारे ह्यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटात त्यांनी देखील अभिनय केलेला तुम्ही पाहिलं असेलच. महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत ह्यांनी जितके चित्रपट एकत्रित केले ते सगळेच सुपरहिट ठरले. त्यावेळी हिंदी चित्रपटांपेक्षा मराठी प्रेक्षक हा मराठी चित्रपटातच प्राधान्य देत होता ह्याच सर्व श्रेय अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, दादा कोंडके ह्यांना जातं. इतकंच नाही तर त्याकाळी अनेक मराठी चित्रपटांचा रिमेक हिंदी सिनेमांनी करून प्रसिद्धी देखील मिळवली होती.

mahesh kothare film
mahesh kothare film

मराठी चित्रपट सृष्टीत धडाकेबाज कामगिरी करून दाखवणाऱ्या कोठारे कुटुंबाविषयी आज जाणून घेऊयात. “छोटा जवान” या चित्रपटाच्या माध्यमातून महेश कोठारे यांनी बालभूमिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. १९६४ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता त्यानंतर ‘राजा और रंक’, ‘घर घर की कहाणी’ हे आणखी बालभूमिकेतील चित्रपट त्यांनी गाजवले. धुमधडाका हा त्यांनी अभिनित, दिग्दर्शित आणि निर्मिती केलेला पहिला चित्रपट. या चित्रपटातून लक्ष्मीकांत बेर्डे यांनाही अमाप प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर बहुतेक चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डेला प्रमुख भूमिका देऊन त्यांनी आपले चित्रपट सुपरहिटच्या यादीत जमा केले. बाटलीतला गंगाराम, जिवंत बाहुलीतला तात्या विंचू अशे भन्नाट कल्पनाशक्ती असलेले त्यांचे चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. अभिनय क्षेत्रात जम बसवण्याआधी त्यांनी आपले एलएलबी चे शिक्षण पूर्ण केले होते. जवळपास तीन वर्षे त्यांनी आपली वकिली यशस्वीपणे सांभाळली होती. अभिनयाचे बाळकडू त्यांना त्यांच्या घरातूनच मिळाले होते. महेश कोठारे यांचे वडील आणि आई हे देखील नाट्य-चित्रपट सृष्टीतील जाणते कलाकार. महेश कोठारे यांच्या अनेक चित्रपटात त्यांच्या वडिलांनी महत्वाच्या भूमिका देखील बजावल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *