तुम्हीसुद्धा “बोन चायना” ची भांडी वापरता का? चिनी भांडी आणि बोन चायना यातील फरक काय? मग हे प्रत्येकाने आवर्जून वाचलेच पाहिजे.

आजकाल प्रत्येक गृहिणीला आपल्या किचनमध्ये आकर्षक क्रॉकरी असावी असे वाटते. सफेद रंगाची सुंदर आणि आकर्षक डिझायनर क्रोकरीचे सेट्सचे सगळ्यांनाच हवेहवेसे वाटतात. तांबे पितळ यासारख्या जुन्या पारंपरिक भांड्याप्रमाणे स्टीलची भांडी देखील लोप होतील की काय असे वाटू लागले आहे. कारण ह्या बोन चायना भांडयाचा मोह कुणालाही आवरता येणे अगदी अशक्यच.आता तर कुणाला भेटवस्तु म्हणून द्यावीशी वाटत असेल तर अशाच प्रकारच्या वस्तुंना प्राधान्य दिले जात आहे. परंतु हो, ह्या वस्तू कशापासून बनवल्या जातात हे जाणून घेतल्यावर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल, कारण नावाप्रमाणेच या वस्तू वास्तवीकतः जनावरांच्या हाडांपासूनच बनवल्या जातात.

खरे तर इंग्रजांच्या काळात चिनी मातीच्या वस्तूंना भरपूर प्रमाणात मागणी होती. इंग्लंडमध्ये अशा वस्तूंचा मोह प्रत्येकालाच आकर्षित करत असे. परंतु चिनी मातीची भांडी महाग असल्याने तशाच प्रकारच्या पर्यायी भांड्यांचा शोध सुरू झाला. १७४८ साली इंग्लंड मधील टॉमस फ्राय नावाच्या व्यक्तीने जनावरांच्या हाडांच्या चुऱ्या पासून अशी भांडी बनविण्यास सुरुवात केली.

स्वस्त पर्याय उपलब्ध झाल्याने त्याने बनवलेल्या या भांडयाला भरपूरप्रमाणात मागणी येऊ लागली. त्यामुळे त्याचा हा व्यवसाय वाढीस लागला. पर्यायाने जनावरांची कत्तल देखील वाढीस लागली. त्यामुळे मांस खाणाऱ्यांपेक्षा ही भांडी बांवण्यासाठीच जनावरे कत्तल खाण्यात जाऊ लागले. या जनावरांमध्ये गाई, म्हशी याचादेखील वापर करू लागले. म्हणूनच ही गोष्ट नक्कीच विचार करायला लावते. आपणच जर अशा वस्तूंचा त्याग केला तर निश्चितच काही प्राण्यांचा जीव नक्कीच आपण वाचवू शकू. या वस्तूला बाजारात अन्य पर्यायदेखील उपलब्ध आहेत.
पण मग तुम्ही म्हणाल अशी भांडी ओळखायची कशी? कारण चिनी मातीची भांडी आणि बोन चायनाची भांडी दिसायला अगदी सारखीच असतात. बोन चायनाची भांडी अर्धपारदर्शक असल्याने उजेडात धरली आणि पाठीमागील बाजूस आपला हात धरला की आपला हात अगदी स्पष्ट दिसून येतो. त्यामुळे ती ओळखणे अगदी सोपे जाते.
बोन चायनाची भांडी बनवण्यासाठी कत्तलखान्यातून जनावरांची हाडे गोळा केली जातात. हाडांवरील मांस काढून अशी हाडे जवळपास १०००℃ तापमानाला वाळवली जातात. पुन्हा या हाडांचा चुरा पाण्यात मिसळून लगदा तयार केला जातो. या लागद्याला भांड्यांचा आकार दिला जातो. त्यावर आकर्षक रंगरंगोटी करून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देतात.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *