कल हो ना हो, मुझसे दोस्ती करोगे यासारख्या चित्रपटातून एक बालकलाकार म्हणून नावारूपास आलेल्या या कलाकाराचे नाव आहे “अथित नाईक”. अबरा का डाबरा हा टीव्ही मालिकेत देखील त्याने एक बालकलाकार म्हणून महत्वाची भूमिका बजावली होती. ७ चित्रपट, १७६ व्यावसायिक जाहिराती आणि २ एपिसोडिक टीव्ही शो त्याने साकारले आहेत. जवळपास गेली ७ वर्षे त्याने आर्ट फॉर्म मधून फिलीपाईन्स, सॅनफ्रान्सिस्को, लॉस एंजेल्स, पोर्टलॅंड येथून शिक्षण घेतले आहे. ३०० शॉर्ट फिल्म्स, ३५ म्युजिक व्होडिओजची निर्मिती देखील त्याने केली आहे.

मुंबईत जन्मलेल्या या मराठमोळ्या मुलाने सिनेमॅटोग्राफर, दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली पाहायला मिळते. ६७ व्या ‘फेस्टिव्हल द कान्स’ मध्ये त्याच्या दोन शॉर्टफिल्मसची निवड करण्यात आली होती. जगभरातल्या फिल्ममेकर्ससाठी हा फेस्टिव्हल तितकाच खास मानला जातो. चित्रपटाचे चित्रीकरण करताना कॅमेरा हा ट्रॉलीवर ठेवला जातो परंतु अथीतने त्याच्या शॉर्टफिल्मचे चित्रीकरण हातात कॅमेरा धरून केले होते. Origami Transmedia नावाने त्याने स्वतःची निर्मिती संस्था उभारली आहे. नुकतीच येऊन गेलेली “सेक्स, ड्रग्ज अँड थिएटर” ही मराठी वेबसिरीज देखील त्याने साकारली आहे. यामार्फत अतिथचे मराठी सृष्टीत पदार्पण देखील झालेले पाहायला मिळते. या वेबसिरीजमध्ये प्रवीण तरडे, सुनील बर्वे, मिताली मयेकर हे कलाकार झळकले होते. “अथित नाईक” ह्याला त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *