praju gaikwad pic

‘नांदा सौख्यभरे’ या मालिकेतून प्राजक्ता गायकवाड यांनी छोट्या पडद्द्यावरून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. परंतु स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून साकारलेल्या महाराणी येसूबाईंच्या भूमिकेमुळे त्या प्रकाशझोतात आल्या. सध्या सोनी मराठी वाहिनीवरील “आई माझी काळूबाई” या मालिकेत आर्याच्या भूमिकेत त्या पाहायला मिळत आहेत. ६ ऑक्टोबर हा प्राजक्ता गायकवाड यांचा जन्मदिवस. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका चाहत्याने त्यांचा हा वाढदिवस एका अनोख्या पद्धधतीने साजरा केलेला पाहायला मिळतो आहे.

prajakta gaikwad birthday
prajakta gaikwad birthday

चाहत्याच्या या कामगिरीमुळे प्राजक्ता पुरत्या भारावून गेल्या आहेत. नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांनी या आपल्या चाहत्याला छानशी प्रतिक्रियाही दिली आहे. त्यांचा हा चाहता सांगली जिल्ह्यातील असून त्याचे नाव ‘आनंद राजेंद्र पुजारी’ असे आहे. ‘ तुम्हाला भेटायचं स्वप्न होतं पण कुठून योग आला नाही म्हणून आम्ही अशा पद्धतीने आपला बिर्थडे केला…’ असे म्हणून गरीब मुलांना फळांचे वाटप आणि धान्य वाटप केलेला एक व्हिडिओ त्यांनी शेअर केला. त्याला छानशी प्रतिक्रिया देत प्राजक्ता म्हणाल्या, ‘असे fans मिळायला खूप नशीब लागतं…Lockdown मुळं भेटता आलं नाही म्हणून काय झालं…अशा प्रकारे सुद्धा Gifts देऊन birthday celebrate करता येऊ शकतो…’ असे म्हणून आपल्या चाहत्याला आश्वस्त करत…’ मलाही सोशल वर्कची आवड आहे आणि आपली नक्कीच भेट होईल’ असे म्हणून आभार व्यक्त केले आहेत. प्राजक्ता गायकवाड यांनी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून साकारलेल्या महाराणी येसूबाईं प्रेक्षक कधीही विसरणार नाहीत ह्याचाच हे एक उदाहरण म्हणायला हरकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *