तुमच्या आवडत्या क्रिकेट खेळाडूंना किती पगार मिळतो माहितीये?…जाणून घेतल्यावर अवाक व्हाल

काही महिन्यांपूर्वीच बीसीसीआयने भारतीय खेळाडूंच्या पगाराची यादी जाहीर केली होती. ऑक्टोबर २०१८ ते सप्टेंबर २०१९ या चालू वर्षात बीसीसीआयने ४ ग्रेड तयार केल्या आहेत. पहिले A ग्रेड, B ग्रेड आणि C ग्रेड अशा वर्गात खेळाडूंना पगार दिला जात असे. परंतु चालू वर्षात A + ही ग्रेड वाढविण्यात आली आहे. A+ ग्रेड मध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह ह्या खेळाडूंची नावे आहेत. ह्या ग्रेड मधील खेळाडूंना वार्षिक पगार तब्बल ७ कोटी एवढा गलेलठ्ठ पगार दिला जातो.

A ग्रेड चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे, एम एस धोनी यांसह ११ खेळाडूंची नावे A ग्रेड यादीत दिली आहेत. या खेळाडूंना ५ कोटी एवढा पगार ह्या वर्षात देण्यात येणार आहे. B ग्रेड के एल राहुल, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, उमेश यादव या चार खेळाडूंना ह्या वर्षी ३ कोटी एवढा पगार दिला जाणार C ग्रेड केदार जाधव, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक यासह ७ खेळाडूंना चालू वर्षाला १ कोटी एवढा पगार दिला जाणार आहे.
भारतीय महिला क्रिकेट खेळाडूंची देखील यादी याठिकाणी बीसीसीआयने जाहीर केली आहे. पुरुष क्रिकेट टीम च्या मनाने महिला क्रिकेट तुमच्या खेळाडूंना अतिशय कमी पगार दिला जात असल्याचे तुमच्या लक्षात येईल. महिला क्रिकेट खेळाडूंसाठी इथे A, B, C असे ३ ग्रेड निवडले आहेत.
A ग्रेड मिताली राज, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, पूनम यादव ह्या खेळाडूंना ५० लाख एवढा पगार आकारण्यात आला आहे.
B ग्रेड शिखा पांडे, दीप्ती शर्मा, झुलन गोस्वामी, एकता बिष्ट जेमिमाह रॉड्रिक्स ह्या पाच खेळाडूंसाठी बोसीसीआयने प्रत्येकी ३० लाख एवढा पगार देणार. C ग्रेड डी हेमलता, राधा यादव, अनुजा पाटील, मानसी जोशी, पूनम राऊत, अरुंधती रेड्डी, मोना मेश्राम सह या ११ खेळाडूंना १० लाख एवढा पगार दिला जाणार आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *